IND vs SA 1st ODI : द. आफ्रिकेचा भारतावर ३१ धावांनी विजय! मालिकेत १-० ने आघाडी | पुढारी

IND vs SA 1st ODI : द. आफ्रिकेचा भारतावर ३१ धावांनी विजय! मालिकेत १-० ने आघाडी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :

द. आफ्रिकेने पहिल्या नवडे सामन्यात भारताचा ३१ धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. यजमान संघाने नाणेफेक जिंकून पहिला फलंदाजी केली आणि ४ बाद २९६ धावा केल्या. त्यामुळे भारताला विजयासाठी २९७ धावा करायच्या होत्या. पण लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंजांची दमछाक झाली. सलामीवीर शिखर धवन (७९), विराट कोहली (५१) आणि शार्दुल ठाकूर (५०) यांचा अपवाद वगळता एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. द. आफ्रिकेकडून एनगिडी, शम्सी आणि फेहलुकवायो यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. मार्कराम आणि केशव महाराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

आठवा झटका….

२१४ धावसंख्येवर भारताला आठवा झटका बसला. शम्सीने भुवनेश्वर कुमारला माघारी धाडले. त्याने अवघ्या ४ धावा केल्या.

सातवी विकेट…

एकूण १९९ धावांमध्ये भारताने सात विकेट गमावल्या आहेत. रविचंद्रन अश्विन १३ चेंडूत सात धावा काढून बाद झाला. त्याला फेहलुकवायोने क्लीन बोल्ड केले.

व्यंकटेश अय्यरही बाद झाला

भारतीय संघ संकटात सापडला आहे. संघाने ३६ षटकांत १८८ धावांत सहा विकेट गमावल्या. व्यंकटेश अय्यरच्या रूपाने संघाला सहावा धक्का बसला. वेंकटेशला पदार्पणाच्या वनडेत सात चेंडूत दोन धावा करता आल्या. त्याला लुंगी एनगिडीने व्हॅन डेर ड्युसेनच्या हाती झेलबाद केले. श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि व्यंकटेश अय्यर यांच्या रूपाने भारताने तीन षटकांतच तीन मोठ्या विकेट्स गमावल्या.

ऋषभ पंत बाद…

१८२ धावसंख्येवर भारताला पाचवा धक्का बसला. ऋषभ पंत यष्टीचीत झाला. ३५ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर फेहलुकवायोच्या गोलंदाजीवर ऋषभ लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू फटकावत होता. त्याचवेळी चेंडू विकेटकीपर डीकॉकच्या हाते गेला, दरम्यान पंत क्रिजच्या बाहेर गेला होता. हेच हेरून डीकॉकने त्याला यष्टीचीत केले.

श्रेयस अय्यर बाद…

लुंगी एन्गिडीने ३३.५ व्य षटकात भारताला चौथा झटका दिला. त्याने श्रेयस अय्यरला डीकॉक करवी झेलबाद केले. श्रेयसने १७ चेंडूत १७ धावा केल्या. यावेळी भारताची धावसंख्या १८१ होती.

विराट कोहलीही बाद झाला

विराट कोहलीने वनडे कारकिर्दीतील ६३ वे अर्धशतक झळकावले. मात्र, त्यानंतर तो फार काळ फलंदाजी करू शकला नाही आणि अवघी एका धाव जोडून तो वैयक्तिक ५१ धावांवर बाद झाला. त्याला तबरेझ शम्सीने टेंबा बावुमाकरवी झेलबाद केले. कोहलीने ६३ चेंडूत तीन चौकारांच्या सहाय्याने ५१ धावा केल्या. यावेळी भारताची धावसंख्या १५२ होती.

Image

शिखर धवन बाद..

१३८ धावांच्या एकूण धावसंख्येवर भारताला दुसरा धक्का बसला. शिखर धवनला केशव महाराजने क्लीन बोल्ड केले. धवन ८४ चेंडूत ७९ धावा करून बाद पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने विराट कोहलीसोबत १०२ चेंडूत ९२ धावांची भागीदारी केली. धवनने आपल्या खेळीत १० चौकार मारले.

Image

शिखर धवनची दमदार खेळी

टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनने दमदार पुनरागमन केले. त्याने द. आफिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत अर्धशतक झळकावले. त्याचे हे ३४ वे अर्धशतक आहे.

भारताला पहिला झटका…

मार्करमने द. आफ्रिकेला पहिले यश मिळवून दिले. ८.३ व्या षटकांत त्याने केएल राहुलला माघारी धाडले. डीकॉकने राहुलचा झेल पकडला. राहुलने १७ चेंडूत १२ धावा केल्या. तो बाद झाला तेव्हा यावेळी भारताची धावसंख्या ४६ होती.

द. आफ्रिकेचे भारतापुढे २९७ धावांचे आव्हान

भारत विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना ५० षटकात ४ गडी गमावून २९६ धावा केल्या. रायसी व्हॅन डेर ड्युसेनने सर्वाधिक १२९ धावा केल्या. टेंबा बाउमाने ११० धावा केल्या. या दोन्ही फलंदाजांनी आपापल्या वनडे कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. रविचंद्रन अश्विनला १ बळी मिळाला. एक फलंदाज धावबाद झाला.

दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉक आणि जानेमन मलान यांनी डावाची सुरुवात केली. मलानला बाद करून जसप्रीत बुमराहने यजमान संघाला पहिला धक्का दिला. तो ६ धावा करून बाद झाला. दीर्घ काळानंतर वनडेमध्ये पुनरागमन करणाऱ्या आर अश्विनने डी कॉकला २७ धावांवर क्लिन बोल्ड करून तंबूचा रस्ता दाखवला. व्यंकटेश अय्यरच्या शानदार ‘थ्रो’ने एडन मार्करामला (४) माघारी परतावे लागले.

कर्णधार बाबुमाने पडझड झालेल्या संघाचा डाव सांभाळला. त्याने कर्णधार पदाला साजेशी खेळी साकारली. पहिला त्याने ७६ चेंडूत ४ चौकारांच्या सहाय्याने अर्धशतक पूर्ण केले. त्याला ड्युसेनची चांगली साथ मिळाली. ड्युसेननेही त्याचे अर्धशतक ४९ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने पूर्ण केले. त्यानंतर दोघांनी संयमी फलंदाजी करत धावफलक हलता ठेवला. बावुमाने १३३ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने शतकी खेळी साकारली. तर त्यानंतर काहीवेळातच डुसेननेही ८३ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले.

अखेर ही जोडी फोडण्यात भारताला यश आले. १४३ चेंडूत ११० धावांची खेळी खेळणाऱ्या बुमुमाला जसप्रीत बुमराहने कर्णधार केएल राहुलकडे झेलबाद केले. बावुमा-डुसेन जोडीने २०४ धावांची विक्रमी भागिदारी केली.

भारताचे फिरकीपटू अपयशी..

६८ धावांवर द. आफ्रिकेच्या तीन विकेट पडल्या. यानंतर बावुमा आणि डुसेन यांनी चौथ्या विकेटसाठी २०४ धावांची भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत पोहचवले. या सामन्यात भारताने दोन फिरकीपटूंना (अश्विन आणि युझवेंद्र चहल) संधी दिली. पण दोघांनी मिळून २० षटकात १०६ धावा दिल्या आणि त्यांना फक्त १ बळी घेता आला. व्यंकटेश अय्यरचा अष्टपैलू प्लेइंग-११ मध्ये समावेश करण्यात आला होता पण कर्णधार केएल राहुलने त्याला एकही षटक दिले नाही.

आफ्रिकेची चौथी विकेट…

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा शतक झळकावल्यानंतर बाद झाला आहे. त्याला बुमराहने राहुल करवी झेल बाद केले. बावुमाने ८ चौकारांच्या सहाय्याने १४३ चेंडूत ११० धावा केल्या. यावेळी द. आफ्रिकेची धावसंख्या २७२ होती.

डुसेनने शतक पूर्ण केले…

रासी व्हॅन डर ड्युसेनने आपल्या वनडे कारकिर्दीतील दुसरे शतक पूर्ण केले आहे. त्याने कर्णधार बावुमासोबत उत्कृष्ट खेळी खेळली आणि आपल्या संघाची धावसंख्या 250 च्या पुढे नेली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी केली.

टेंबा बावुमाचे शतक…

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने आपले शतक पूर्ण केले आहे. त्याने १३३ चेंडूत १०० धावा केल्या आहेत. त्याचे कारकिर्दीतील हे दुसरे शतक आहे. यावेळी बावुमाने डसेनसोबत १७२ धावांची भागीदारी झाली होती. चौथ्या विकेटसाठी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची ही सर्वोच्च भागीदारी आहे. यापूर्वी डी कॉक आणि डिव्हिलियर्सने २०१३ मध्ये १७१ धावा जोडल्या होत्या. आफ्रिकेची धावसंख्या २५० पार गेली आहे. अजून पाच षटके बाकी असून दोघेही धावसंख्या ३०० च्या जवळ नेण्याचा प्रयत्न करतील.

टेंबा बावुमाचे शतक…

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने आपले शतक पूर्ण केले आहे. त्याने १३३ चेंडूत १०० धावा केल्या आहेत. त्याचे कारकिर्दीतील हे दुसरे शतक आहे.

बामुवा-डुसेन जोडीची दीडशतकी भागिदारी…

टेंबा बावुमा आणि डुसेन यांच्यात १५० हून अधिक धावांची भागीदारी झाली आहे. या दोघांविरुद्ध भारतीय गोलंदाज निष्प्रभ ठरले आहेत. दोन्ही फलंदाज शतकाच्या दिशेने वाटचाल करत असून आफ्रिकेची धावसंख्या ३०० च्या पुढे नेण्याचा प्रयत्न करतील. डेव्हिड मिलर अद्याप क्रीझवर आलेला नाही. अशा स्थितीत आफ्रिकन संघ शेवटच्या षटकात जलद धावा करून ३०० च्या जवळपास धावा करू शकतो. या मैदानावर २५० हून अधिक धावांचा पाठलाग करणे भारतासाठी सोपे नसेल.

डुसेनचे अर्धशतक…

कर्णधार बावुमानंतर डुसेननेही अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने ४९ चेंडूत ५४ धावा केल्या. डुसेन जेव्हा क्रीझवर आला तेव्हा आफ्रिकेची धावसंख्या ६८ धावा होती, पण त्यानंतर त्याने कर्णधार बावुमासोबत शानदार भागीदारी रचली आणि संघाचा डाव सावरला.

बामुवा-डुसेन जोडीची शतकी भागिदारी..

चहलच्या ३३.४ व्या षटकात बावुमाने १ धाव काढून डुसेनसोबतच्या शतकी भागिदारीचा टप्पा पूर्ण केला. या जोडीने ९७ चेंडूत १०० धावा केल्या आणि संघाचा डाव खंबिरपणे सावरला. ही फोडण्यात भारतीय गोलंदाज प्रयत्नशील आहेत पण त्यांना अपयश येत आहे.

बावुमा आणि डुसेन यांनी वनडेत दुसऱ्यांदा शतकी भागीदारी केली आहे. यापूर्वी या दोघांनी पाकिस्तानविरुद्ध शतकी भागीदारी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. या सामन्यात बावुमा फलंदाजीला आला तेव्हा आफ्रिकेची धावसंख्या १९ धावा होती. तेव्हापासून बावुमाने कर्णधारपदाची खेळी खेळत संघाची धावसंख्या २०० च्या जवळ पोहोचवली.

Image

आफ्रिकेची धावसंख्या १५० पार…

दक्षिण आफ्रिकेने तीन गड्यांच्या मोबदल्यात १५० धावा पूर्ण केल्या. यावेळी कर्णधार टेंबा बावुमा आणि डुसेन यांच्यात ८३ धावांची भागीदारी झाली. या दोघांनीही द. आफ्रिकेचा डाव सावरला. ही भागीदारी तोडण्यासाठी भारतीय कर्णधार लोकेश राहुलने बुमराह आणि भुवनेश्वरलाही गोलंदाजी दिली, मात्र टीम इंडियाला यश मिळालेले नाही.

बावुमाचे अर्धशतक…

द. आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले. त्याने 76 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. यादरम्यान त्याने डुसेनसोबत अर्धशतकी भागीदारी केली.

Image

बावुमा आणि डुसेन यांची अर्धशतकी भागीदारी..

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा आणि डुसेन यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. दोघांनी वेगाने धावा केल्या. आणि संघाचा डाव पुढे नेला. या दोघांनी 46 चेंडूत 50 धावा केल्या. या जोडीने फिरकीपटू चहलविरुद्ध चांगल्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. भारतीय संघाला ही भागीदारी लवकरात लवकर तोडायला लागेल.

द. आफ्रिकेचे शतक…

२३ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर व्हॅन डर डुसेनने १ धाव काढून संघाचे शतक धावफलकावर झळकावले. हे षटक चहलने फेकले.

व्यंकटेश अय्यरचा अचूक थ्रो.. मार्करम बाद..

द. आफ्रिकेची धावसंख्या ६८ असताना त्यांना मार्करमच्या रुपात तिसरा झटका बसला. भारताकडून वनडे प्रदार्पण करणा-या व्यंकटेश अय्यरने उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाच्या जोरावर १७.४ व्या षटकात नॉन स्‍ट्राइकर एन्डवर डायरेक्‍ट थ्रो केला आणि मर्करमला रनआउट केले. ऑफ स्‍टंपच्या जवळ फेकलेला चेंडू मार्करमने मिडऑफच्या दिशेने ढकलला. आणि एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. बावुमानेही धाव घेण्यासाठी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. पण त्याचवेळी क्षेत्ररक्षक अय्यरने वेगाने येत चेंडू पकडला आणि नॉन स्‍ट्राइकर एन्डच्या दिशेने स्‍टंप्‍सवर फेकला. त्याच्या या अचून थ्रोने मार्करमला तंबूत जावे लागले.

Image

Image

आश्विनचा दे धक्का… द. आफ्रिकेची दुसरी विकेट…

१५ व्या षटकानंतर ब्रेक घेण्यात आला. हा ब्रेक संपल्यानंतर आर अश्विने १६ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर द. आफ्रिकेला दुसरा झटका दिला. त्याने डिकॉकला क्लिन बोल्ड केले. ऑफ स्‍टंपवर चेंडू गुड लेंथवर फेकला. त्यानंतर चेंडू इन स्विंग झाला. डीकॉकला हा चेंडू खेळता आला नाही. तू अश्विनच्या जाळ्यात अडकला आणि चेंडू स्‍टंप्‍सवर जावून आदळला. डीकॉकने ४१ चेंडूत २७ धावा केल्या.

Image

द. आफ्रिकेचे अर्धशतक…

११.३ व्या षटकात आर अश्विनच्या गोलंदाजीवर डीकॉकने २ धावा घेत द. आफ्रिकेचे अर्धशतक धावफलकावर झळकावले.

बुमराहला थांबवले..

पहिली आठ षटके बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांनी टाकली. त्यानंतर गोलंदाजीत बदल करण्यात आला. बुमराहला थांबवून ९ व्या षटकात शार्दुल ठाकूरला चेंडू देण्यात आला. शार्दुलने फेकलेल्या या षटकात ४ धावा दिल्या. त्यानंतर १२ व्या षटकात चेंडू आर अश्विनकडे सोपवण्यात आला आणि भुवनेश्वर कुमारला थांबवण्यात आले. या षटकात अश्विनने ६ धावा दिल्या.

बुमराहने ४१२ दिवसांनी घेतली विकेट..

जसप्रीत बुमराहने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४१२ दिवसांनंतर विकेट घेतली. त्याने २ डिसेंबर २०२० रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात शेवटची विकेट घेतली. या सामन्यानंतर त्याला ५० षटकांच्या फॉरमॅटमधून विश्रांती देण्यात आली होती. आज आफ्रिकेविरुद्ध संघात पुनरागमन करत त्याने यनेमान मलानला बाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

द. आफ्रिकेची पहिली विकेट

जसप्रीत बुमराहने भारताला पाचव्याच षटकात पहिले यश मिळवून दिले. बुमराहने त्याच्या आधीच्या षटकात इन स्विंगचा मारा केला. पण बुमराहच्या या आक्रमणाचा मलानने यशस्वी बचाव केला. मात्र, पुढच्या षटकात बुमराहने रणनिती बदलली. यावेळी पाचव्या षटकाचा दुसरा चेंडू टाकताना त्याने मलानला चकवले. हा चेंडू मलानने पाय क्रिझमध्ये ठेवत बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. पण खेळपट्टीवर चेंडू पडताच तो आऊट स्विंग झाला. मलानने कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू बॅटची बाहेरील कडा घेऊन विकेटकीपर ऋषभ पंतच्या ग्लोव्हजमध्ये गेला. मलानने १० चेंडूत ६ धावा केल्या. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेनंतर पहिल्या १० षटकांतील मलानची विकेट ही बुमराहची पहिली विकेट ठरली.

अय्यरचे वनडे पदार्पण…

व्यंकटेश अय्यरला भारताकडून वनडे पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. यासोबतच आर अश्विनने ५ वर्षांनंतर वनडे प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन केले आहे. तो शेवटचा वनडे २०१७ मध्ये खेळला होता. केएल राहुल एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार होणारा भारताचा २६ वा खेळाडू तर वेंकटेश अय्यर वनडेमध्ये पदार्पण करणारा टीम इंडियाचा २४२ वा खेळाडू ठरला. दुसरीकडे द. आफ्रिकेच्या संघालडून मार्को जेन्सनही वनडे फॉरमॅटमध्ये पदार्पण केले आहे.

Image

राहुलसोबत ओपनिंगला धवन की ऋतुराज गायकवाड?

दक्षिण आफ्रिकेविरुद्‍धची कसोटी मालिका गमावल्‍यानंतर आज (दि. १९) टीम इंडिया वन डे मालिकेतील (IND vs SA ODI ) पहिला सामना खेळत आहे. ऑक्‍टोबर २०१६ पासून प्रथमच विराट कोहली याच्‍या नेतृत्‍वाविना टीम इंडिया मैदानात उतरली आहे. तब्‍बल पाच वर्षांनंतर विराट हा एक खेळाडू म्‍हणून संघात आहे. विराटकडे कर्णधारपद नसले तरी त्‍याच्‍या खेळीकडे क्रिकेट चाहत्‍यांचे लक्ष आहे. तसेच के. एल. राहुलसोबत ओपनिंगला शिखर धवन येणार की ऋतुराज गायकवाड? याची चाहत्‍यांना उत्सुकता आहे.

भारताचा संघ

केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, शार्दुल ठाकूर, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल

द. आफ्रिकेचा संघ

क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), येनेमन मलान, एडेन मार्कराम, रायसे व्हॅन डर ड्युसेन, टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड मिलर, अँडिले फेहलुकवायो, मार्को येन्सेन, केशव महाराज, तबरीझ शम्सी, लुंगी एन्गिडी.

 

 

 

Back to top button