‘सह्याद्री’त आदित्य ठाकरे बालंबाल बचावले | पुढारी

‘सह्याद्री’त आदित्य ठाकरे बालंबाल बचावले

मुबंई : पुढारी ऑनलाईन 

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे सह्याद्री अतिथीगृहाच्या एका हॉलमध्ये बैठक घेत असताना अचानक बाहेरील हॉलमधील सिलिंग झुंबरासह कोसळले. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले असून सर्वांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. 

वाचा : चंद्रकांत पाटील यांच्या भाकितामुळे झोपेतून घाबरून जागा होतो : अजित पवार

शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. यावेळी आदित्य ठाकरे या इमारतीत असल्याने प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. ठाकरे हे सायंकाळी पर्यावरणाशी संबधित एका बैठकीसाठी सह्याद्री अथितीगृहात आले होते. बैठक सुरू झाली तोच हॉल क्रमांक चारचा स्लॅब झुंबरासह खाली कोसळला. स्लॅब कोसळत असताना सर्वांना तातडीने बाहेर काढण्यात आले. 

या इमारतीचे बांधकाम २५ वर्षांपूर्वीचे असून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. बैठक सुरू झाल्यानंतर काही वेळातच स्लॅब पीओपीसह कोसळला. त्यामुळे मोठा आवाज झाला. त्यामुळे पोलिस आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांत एकच गोंधळ उडाला. ठाकरे यांनी या घटनेमुळे बैठक थांबविली. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले असून स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. 

वाचा : राज्य मागासवर्गीय आयोग अध्यक्षपदी आनंद निरगुडे

दरम्यान या घटनेनंतर शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी ट्विट केले असून ‘महाराष्ट्रासाठी ही फारच क्लेशदायक आणि धक्कादायक घटना आहे. आदित्य ठाकरे आणि त्यांच्यासोबत असलेले सर्व कर्मचारी सुखरूप आहेत हे महत्त्वाचे. छत कोसळत आहे हे लक्षात आल्यावर प्रसंगावधान दाखवलं गेलं हे चांगलं असलं तरी या बांधकामाची आणि घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी,’ अशी मागणी केली आहे. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य मंत्री बैठका घेत आहेत. कोरोना काळात येथे महत्त्वाच्या बैठका होतात. शुक्रवारी अन्य कोणत्याही बैठका नसल्याने मोठा अनर्थ टळला.

वाचा : राज्यात सोमवारपासून अनलॉक प्रक्रिया! जाणून घ्या आपला जिल्हा कधी सुरु होणार?

 

Back to top button