तर १५ दिवस क्वारंटाईन! अजित पवारांचा इशारा | पुढारी

तर १५ दिवस क्वारंटाईन! अजित पवारांचा इशारा

पुणे; पुढारी ऑनलाईन : पुणे शहरात शनिवार आणि रविवारी निर्बंध राहतील. या दोन दिवशी शहरामध्ये कडक पोलिस बंदोबस्त असेल. याशिवाय ग्रामीण भागातील बाधित दर कमी न झाल्याने निर्बंध कायम राहतील. नागरिकांनी सहलीला, ट्रेकिंगला जावू नये असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

अधिक वाचा : पुणे : वाहनाने दिलेल्या भीषण धडकेत आई, वडील आणि मुलाचा जागीच मृत्यू

पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयात शनिवारी कोरोना आढावा बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

अधिक वाचा : …आणि काँग्रेसनं दुरुस्त केली भाजपची छत्री 

पवार म्हणाले, नागरिकांनी कोरोनाला गांभीर्याने घेतले पाहिजे. काहीजण पुण्यातून बाहेर राज्यात फिरण्यासाठी किंवा देवदर्शनासाठी गेले आहेत. त्यामुळे जर वेळप्रसंगी बाहेर राज्यात गेलेल्या नागरिकांना पुण्यात आल्यानंतर पंधरा दिवस विलगीकरणात ठेवावे लागेल. पुणे जिल्ह्यात दीड लाख लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध झाली तर हे लसीकरण करणे शक्य होईल शिवाय, सोसायटीमध्ये जाऊन देखील लस देता येईल. डब्लूएचएने कोविशील्ड लस घेऊन परदेशी जाण्यास परवानगी दिली आहे. पण कोव्हक्सिनची लस घेऊन बाहेर जाण्यास परवानगी नाही. त्याबाबत बैठकीत चर्चा झाली. त्यामुळे काही विद्यार्थी कोव्हक्सिनची लस घेऊन देखील परदेशी जाण्यासाठी पुन्हा कोविशील्डची घेतील. तर अस करू नका, तज्ज्ञांचे म्हणणे अशा प्रकारे दोन डोस घेऊ नयेत.

अधिक वाचा : पुणे : माय-लेकराच्या मर्डर मिस्ट्रीचा उलघडा

टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी इतर देशाचे उदाहरण सांगून तिसऱ्या लाटेचं गांभीर्य सांगितले. त्यामुळे आपण काळजी घेतली पाहिजे असे ते म्हणाले. 60 वर्षांवरील लोकांना पहिल्या लाटेत त्रास झाला, पण आता 30 ते 60 वयोगटातील लोकांचा मृत्यू अधिक झाला. 43 टक्के मृत्यू, सहव्याधी नसलेल्या लोकांचा मृत्यू झाला. त्यांना कोणताच आजार नव्हता. 20 टक्के मृत्यू हे 20 ते 25 वयोगटातील आहेत, महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण जास्त होते. गृहवीलगीकरणातील ऑक्सिजन पातळी कमी झाल्यावर उपचार घेतले पाहिजे. 

 

Back to top button