

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बिग बॉस मराठी-३ च्या घरात आज टास्कसोबतच जबरदस्त कार्यक्रम रंगणार आहे. दादुस ऑर्केस्ट्रा – फॅशन शोभेल तुला या प्रोमोचे काल प्रक्षेपण झाले. या प्रोमोमध्ये अचानक दोन महिला आणि दोन पुरुष वेगळ्याच गेटअपमध्ये दिसून आले. कोण आहेत हे नवीन सदस्य बिग बॉस मराठी – ३ च्या घरामध्ये हा प्रश्न मनात येऊन गेला.
उत्कर्ष शिंदे आणि विकास पाटील यांनी बायकांचा गेटअप केला. तर सुरेखा कुडची आणि मीनल शाह हिने पुरुषांचा गेटअप परिधान केला आहे. चोघे सुध्दा त्यामध्ये एकदम पर्फेक्ट दिसत आहेत. असं म्हणायला हरकत नाही.
दादुस ऑर्केस्ट्रा – फॅशन शोभेल तुला या कार्यक्रमात विकास पाटील नृत्य सादर करणार आहे. हृदयी वसंत फुलताना या गाण्यावर मीनल शाहसोबत डान्स करणार आहे. उत्कर्ष शिंदे, सुरेखा कुडचीही 'पोरगी साजूक तुपातली' या गाण्यावर धम्माल डान्स करणार आहे.
त्यांना साथ मिळणार आहे दादुस (संतोष चौधरी) यांची. घरातला माहोल एकदम हलकाफुलका होताना दिसणार आहे सदस्यांनी बरीच धम्माल मस्ती केलेली या प्रोमोमधून दिसून येते आहे.
कसा झाला आहे दादुस ऑर्केस्ट्रा – फॅशन शोभेल तुला कार्यक्रम बघा. आजच्या बिग बॉस मराठीच्या भागामध्ये रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.