वॉशिंग्‍टन विमानतळाबाहेर पावसातही पंतप्रधान मोदींच्‍या स्‍वागतासाठी गर्दी | पुढारी

वॉशिंग्‍टन विमानतळाबाहेर पावसातही पंतप्रधान मोदींच्‍या स्‍वागतासाठी गर्दी

वॉशिंग्‍टन ; पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तीन दिवसांच्‍या दौर्‍यासाठी अमेरिकेत पोहचले. यावेळी
वॉशिंग्‍टन विमानतळाबाहेर त्‍यांच्‍या स्‍वागतासाठी अमेरिकेतील भारतीय नागरिकांनी गर्दी केली होती. वॉशिंग्‍टन विमानतळाबाहेर मोदी यांच्‍या समर्थनात घोषणात देत त्‍यांचे उत्‍स्‍फूर्त स्‍वागत करण्‍यात आले. पावसाच्‍या सरी बसरत होत्‍या तरीही शेकडो भारतीयांनी मोदींच्‍या स्‍वागतासाठी  गर्दी केली होती.

पंतप्रधान मोदींचा दौरा ठरणार महत्‍वपूर्ण

पंतप्रधान मोदी हे बुधवारी दिल्‍लीतून अमेरिकेला रवान झाले होते. अमेरिकेच्‍या तीन दिवसांच्‍या दौर्‍यामध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष जो बायडेन आणि उपराष्‍ट्राध्‍यक्षा कमला हॅरीस यांच्‍याशी चर्चा करणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी साडेबारा वाजत अमेरिकेच्‍या उपराष्‍ट्रध्‍यक्षा कमला हॅरिस यांची भेट घेणार आहेत. यावेळी उभय देशांमधील विविध मुद्‍यांवर विशेष करुन विज्ञान आणि उद्‍योग क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा होणार आहे.यावेळी मोदी हे क्‍वाड देशांच्‍या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. तसेच २५ सप्‍टेंबर रोजी संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या आमसभेलाही ते संबोधित करणार आहेत.

पावसाच्‍या सरीत मोदींचे स्‍वागत

पंतप्रधान मोदी हे वॉशिंग्‍टन विमानतळावर पोहचले तेव्‍हा पावसाच्‍या हलक्‍या सरी बरसत होत्‍या. त्‍यांच्‍या स्‍वागतासाठी अमेरिकेतील भारतीय नागरिकांनी गर्दी केली होती.यावेळी त्‍यांनी मोदी यांच्‍या समर्थनात घोषणात देत त्‍यांचे उत्‍स्‍फूर्त स्‍वागत केले. यावेळी भेटीला आलेल्‍या भारतीय नागरिकांची मोदी यांनी भेट घेतली. त्‍यांनी हस्‍तांदोलन करत त्‍यांच्‍याशी संवाद साधला.यानंतर ट्‍विट करत त्‍यांनी म्‍हटलं आहे की, वॉशिंग्‍टन विमानतळाबाहेर माझे स्‍वागत करणार्‍या सर्वांचे मी आभारी आहे. अनिवासी भारतीय ही आमची ताकद आहेत. अनिवासी भारतीयांनी जगभरातील विविध देशांमध्‍ये स्‍वत:ला सिद्‍ध केले आहे.

ऑस्‍ट्रेलियाच्‍या पंतप्रधानांशी साधणार संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पाच बड्या कंपन्‍यांच्‍या सीईओंशी चर्चा करणार आहेत. त्‍याचबरोबर क्‍वाड देशांच्‍या शिखर परिषदेसाठी अमेरिकेत आलेले ऑस्‍ट्रेलियाचे पंतप्रधान स्‍कॉट मॉरिसन यांच्‍यीही ते भेट घेणार आहेत.

हेही वाचलं का ?

व्‍हिडिओ

 

Back to top button