

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : अज्ञातांनी दगडाने ठेचून तरूणाचा खून केला. ही धक्कादायक घटना आज (गुरुवार) सकाळी उघडकीस आली. दगडाने ठेचून तरूणाचा खून झाल्याच्या बातमीने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रोहन कांबळे (३०, रा. धायरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रोहन हा डांगे चौक येथील देशी दारूच्या दुकानात कामाला होता. दरम्यान, बुधवारी रात्री अज्ञात दोन इसमांनी त्याचा खून केला. सकाळी दुकानातील इतर कामगारांनी पाहिल्यानंतर खुनाची घटना उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच उपायुक्त आनंद भोईटे यांच्यासह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून हा खून झाला असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. वाकड पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.