मध्य प्रदेशात नेतृत्वबदल? शिवराज सिंग चौहान यांचा तातडीचा दिल्ली दौरा | पुढारी

मध्य प्रदेशात नेतृत्वबदल? शिवराज सिंग चौहान यांचा तातडीचा दिल्ली दौरा

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन: भाजप विविध राज्यांतील मुख्यमंत्री बदलत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मध्य प्रदेशात जाऊन एका वेगळ्याच नेत्याचे कौतुक केल्याने शिवराज सिंग चौहान दिल्लीत दाखल झाले आहेत. खुर्ची टिकविण्यासाठी ते पळापळ करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळ रंगली आहे.

मुख्यमंत्री चौहान यांनी वेगवेगळ्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. तसेच राज्यपालांचीही भेट घेतली आहे.

चौहान यांची खुर्ची डळमळीत झाल्याने ते राज्यात वेगाने दौरे करत असल्याचे बोलले जात आहे.

नुकताच त्यांनी दिल्लीचा दौरा केला. या दौऱ्यात केंद्रीय मंत्र्यांसोबत भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांचीही त्यांनी भेट घेतली.

बुधवारी शिवराज सिंह चौहान यांनी भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आर. के. सिंह यांची भेट घेतली.

राज्यात सरकारद्वारे होत असलेल्या विकासकामांची माहिती पक्षाध्यक्ष नड्डा यांना दिली असे ट्विट त्यांनी केले आहे.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.

राकेश सिंग यांचे नाव चर्चेत

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खासदार राकेश सिंग यांचे जाहीर कौतुक केले.

तेव्हापासून शिवराज सिंग यांना नेतृत्व बदलाची भीती आहे.

भाजपने उत्तराखंड, कर्नाटक आणि गुजरातमध्ये मुख्यमंत्री बदला केला आहे. गुजरातमध्ये संपूर्ण मंत्रिमंडळ बदलून धक्का दिला आहे.

मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान भाजपचे बडे नेते आहेत. गेल्या दोन दशकांपासून भाजपची सत्ता आल्यानंतर तेच मुख्यमंत्री आहेत.

त्यामुळे नव्या नेतृत्वाला संधी मिळाली नाही असा आरोप केला जात आहे. त्यामुळे तेथे चौहान यांना बदलून नवा मुख्यमंत्री करावा,

असे तर पक्षश्रेष्ठींच्या मनात नाही ना? याचा कानोसा त्यांनी दिल्ली दौऱ्यात घेतल्याचे बोलले जात आहे.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी केंद्रीय उर्जामंत्री आर. के. सिंग यांचीही भेट घेतली.

राज्यपालांचीही घेतली भेट

शिवराज सिंग चौहान यांनी १९ सप्टेंबर रोजी राज्यपाल मंगुभाई पटेल यांचीही भेट घेतली होती.

काँग्रेस नेत्यांनी ही भेट ‘असामान्य’ असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचलं का? 

Back to top button