Adah Sharma : सुशांत सिंह राजपूतचे घर खरेदी करण्यावर अदा शर्माने सोडले मौन | पुढारी

Adah Sharma : सुशांत सिंह राजपूतचे घर खरेदी करण्यावर अदा शर्माने सोडले मौन

पुढारी ऑनलाईन डेस्क : अदा शर्माने सुशांत सिंह राजपूतचे घर खरेदी करण्याच्या प्रश्नावर मौन सोडले. मागील वर्षी अदा शर्माला दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अपार्टमेंटच्या बाहेर पाहण्यात आले होते. २०२० मध्ये सुशांत निधनाच्या आधी येथे राहत होता. तेव्हापासून अदा शर्माला (Adah Sharma) त्याची ही संपत्ती खरेदी करण्याविषयी संभाव्य प्रश्न विचारले जायचे. अदाने आता म्हटले आहे की, योग्य वेळ आल्यावर या प्रकरणी बोलेन. आता एका मुलाखतीत तिने उघडपणे आपले मत व्यक्त केले आणि काय काय म्हटले पाहा- (Adah Sharma)

एका मुलाखतीत अदा शर्माने अपार्टमेंट खरेदी करण्याच्या प्रश्नावर उत्तर देत म्हटले की, ‘आतासाठी मी फक्त इतकचं म्हणेन की, मी सर्वांच्या मनावर राज्य करते. बोलण्याची हे एक योग्य वेळ असते. जेव्हा मी ते ठिकाण पाहायला गेले होते, तेव्हा मीडियाचे लक्ष पाहून मी एक खासगी व्यक्ती आहे. मला आपल्या चित्रपटांसाठी लोकांच्या नजरेत राहणे आवडते. पण, नेहमी मी खासगी राहिलीये. मी माझी प्रायव्हेसी प्रोटेक्ट करत आलीये.’

सुशांत सिंह राजपूत विषयी काय म्हणाली अदा शर्मा?

सुशांत सिंह राजपूतच्या अपार्टमेंट विक्री करण्यात ऑनलाईन होणाऱ्या नकारात्मक टीकेविषयी तिने नाराजी व्यक्त केली. तिने आपला विश्वास व्यक्त केला, कुण्या अशा व्यक्तीच्या विषयी वाईट बोलणे अयोग्य आगे, जे आज आपल्यासोबत नाही. खासकरून सुशांत सिंह राजपूत सारख्या व्यक्ती विषयी, ज्यांनी उल्लेखनीय चित्रपटांसोबत चित्रपटामध्ये आपले अमूल्य योगदान दिलं.

अदा शर्माला आवडत नाही ही गोष्ट

अदाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले की, आपल्यावर केलेली टीका सहन करू शकते. पण ही गोष्ट तिला आवडत नाही. ती म्हाणाली की, सुशांतच्या या संपत्तीविषयी योग्य वेळ आल्यानंतर बोलेन.

Back to top button