Emraan Hashmi : इमरान हाश्मी ‘ग्राउंड झिरो’साठी करणार काम, फरहान अख्तरसोबत झळकणार | पुढारी

Emraan Hashmi : इमरान हाश्मी 'ग्राउंड झिरो'साठी करणार काम, फरहान अख्तरसोबत झळकणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : इमरान हाश्मी फरहान अख्तरसोबत या प्रोजेक्ट्ससाठी काम करणार आहे. बॉलीवूड अभिनेता इमरान हाश्मी सध्या चर्चेत आहे. कारण आहे टायगर ३, OTT शो टाईम आणि आता ग्राउंड झिरो या नव्या चित्रपटात दिसणार आहे. (Emraan Hashmi) बॉलिवूड OG स्टार इमरान हाश्मी आता फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटसोबत त्याच्या पुढील प्रोजेक्ट ‘ग्राऊंड झिरो’साठी सोबत काम करणार आहेत. या चित्रपटात इमरान पहिल्यांदाच भारतीय सैन्य अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. (Emraan Hashmi)

‘ग्राउंड झिरो’ मध्ये बीएसएफ २ कमांड नरेंद्र नाथ धर दुबे यांच्या प्रवासाचा इतिहास आहे, ज्याची भूमिका इमरानने साकारली आहे. ‘ग्राउंड झिरो’ हा तेजस प्रभास आणि विजय देवस्कर दिग्दर्शित असलेला चित्रपट आहे. इमरानला कधीही न पाहिलेल्या अवतारात तो दिसणार आहे. संचित गुप्ता आणि प्रियदर्शी श्रीवास्तव यांनी लिहिलेल्या या चित्रपटात झोया हुसैन, सई ताम्हणकर, मुकेश तिवारी, रॉकी रैना, दीपक परमेश आणि ललित प्रभाकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

ग्राउंड झिरो’ हा प्रोजेक्ट इमरानसाठी खास ठरणार आहे. पण, सोबतीला त्याचा अष्टपैलुत्वात भर घालते. कामाच्या आघाडीवर ‘ग्राउंड झिरो’ व्यतिरिक्त, इमरानकडे काही खास प्रोजेक्ट्स सुद्धा आहेत. सारा अली खान स्टारर ‘ए वतन मेरे वतन’मध्ये तो राम मनोहर लोहियाच्या भूमिकेत दिसणार आहे. पवन कल्याण स्टारर ‘ओजी’ आणि ‘गुडाचारी २’ या चित्रपटातून तो तेलुगू चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे.

Back to top button