The Railway Men : ‘त्या रात्रीचे कोणतेही फुटेज नाही, सेट पुन्हा करावा लागला’ | पुढारी

The Railway Men : 'त्या रात्रीचे कोणतेही फुटेज नाही, सेट पुन्हा करावा लागला'

पुढारी ऑनलाईन डेस्क : द रेल्वे मॅन, नवोदित दिग्दर्शक शिव रवैल यांनी दिग्दर्शित केला आहे. आदित्य चोप्राच्या मार्गदर्शनाखाली यशराज फिल्म्समध्ये तो घडला आहे. (The Railway Men ) रेल्वे मॅन ही भोपाळमधील भारतीय रेल्वेच्या कर्मचार्‍यांनी दाखवलेल्या विलक्षण वीरतेची कहाणी आहे. गॅस गळतीच्या भयंकर रात्री आपल्या सहकारी नागरिकांना वाचवण्यासाठी या व्यक्ती सर्व अडचणी विरुद्ध कशा उभ्या राहिल्या होत्या, याची कहाणी दर्शवण्यात आली आहे. (The Railway Men )

नेटफ्लिक्स आणि वायआरएफ एंटरटेनमेंटची सीरीज द रेल्वे मॅन, वीरता, आशा आणि मानवतेची एक थरारक कथा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड लोकप्रिय झाली आहे. वायआरएफने लॉन्च केलेल्या सीरीजचा दिग्दर्शक शिव रवैल म्हणतात, भोपाळमध्ये प्राणघातक वायूची गळती झाली त्या रात्रीची कोणतीही प्रतिमा किंवा फुटेज नव्हते. भोपाळमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी ही शोकांतिका किती भयंकर होती हे लोकांना दाखवण्यासाठी सीरीज मध्ये चित्रित केलेली प्रत्येक गोष्ट पुन्हा तयार करावी लागली आणि पुन्हा कल्पना करावी लागली.

शिव म्हणतात, “आम्ही संशोधन करत असताना आम्हाला समजले की, रात्रीची कोणतीही इमेज किंवा फुटेज नाही. म्हणून, सर्वकाही आम्हाला पुन्हा तयार करावे लागले. आम्हाला ते तुमच्यासाठी विश्वासार्ह बनवायचे होते. म्हणून, जग त्या रात्रीचे आहे असे दिसले पाहिजे. प्रथम, आम्ही चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली, जी १३०-१४० पृष्ठांची होती. मग आम्ही असे होतो की जर आम्हाला फीचर फिल्म बनवायची असेल तर आम्हाला बरेच घटक काढून टाकावे लागतील!”

दिग्दर्शक शैव

सत्यकथांनी प्रेरित, ही आकर्षक मालिका मानवतेच्या अदम्य आत्म्याचा उत्सव आहे. आर माधवन, दिव्येंदू आणि बाबिल खान यांचा समावेश असलेल्या उत्कृष्ट कलाकारांसह, द रेल्वे मॅन जागतिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर येताच हिट झाला आहे.

Back to top button