Pashmina Roshan : ऋतिक रोशनची बहिण पश्‍मीना रोशनचे बॉलिवूडमध्ये पदार्पण; रोहित सराफसोबत रोमँटिक

Pashmina Roshan
Pashmina Roshan

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनची बहिण आणि संगीत दिग्दर्शक राजेश रोशन यांची मुलगी पश्मीना रोशन नुकतेच बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा पदार्पण केलं आहे. पश्मीनाचा आगामी 'इश्‍क विश्‍क रिबाउंड' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटातील पहिले पोस्टर सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्याच्या नजरा पश्मीनावर खिळल्या. या पोस्टरसोबत निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे.

कोण आहे पश्‍मीना रोशन?

  • ऋतिक रोशनची बहिण आणि दिग्दर्शक राजेश रोशन यांची मुलगी पश्मीना रोशन
  • पश्मीना रोशनचे पहिल्यादा बॉलिवूडमध्ये पदार्पण
  • रोहित सराफसोबत भूमिका साकारणार 

२००३ मध्ये बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री अमृता रावने 'इश्‍क विश्‍क' या चित्रपटातून पहिल्यांदा डेब्‍यू केले होते. हा चित्रपटात कॉलेज जीवनालीत एकमेंकावरील असणारे प्रेम दाखविले होते. हा चित्रपट खूपच गाजला. याचीच कल्पना घेवून निर्मात्यांनी आगामी 'इश्‍क विश्‍क रिबाउंड' चित्रपटाची निर्मिती केली आहे. नुकतेच सोशल मीडियावर या चित्रपटातील एक धमाकेदार पोस्टर शेअर करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये एखूण चार कलाकार दिसत आहेत.

'या' दिवशी येणार भेटीला

या पोस्टरमध्ये लिहिलंय की, अविनाश धर्माधिकारी दिग्दर्शित 'इश्क विश्क रिबाउंड' पुढील महिन्यात २१ जून २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील पश्मिना रोशनने सान्या नावाचे भूमिका साकारली आहे. तर अभिनेता रोहित सराफने राघवची भूमिका साकारली आहे. दोघांची क्यूट नवी जोडी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. यामुळे चाहते चित्रपटासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.

चित्रपटातील दुसरी जोडी

पश्मीना रोशन आणि रोहित सराफ याच्यासोबत चित्रपटात दुसरी जोडी असणार आहे. अभिनेता जिब्रान खानने चित्रपटात 'साहिर'ची भूमिका साकारली आहे. तर त्याची मैत्रीण 'मामला लीगल है' फेम नायला ग्रेवाल ही आहे. नायलाने 'रिया'ची भूमिका साकारली आहे.

'मिसमॅच्ड'मध्ये दिसला होता रोहित

'इश्क विश्क रिबाउंड' मध्ये पश्मीनासोबत रोहित सराफची जोडी आहे. याआधी रोहित 'मिसमॅच्ड' या लोकप्रिय वेब सीरिजमध्ये ऋषी शेखावतच्या भूमिकेत दिसला होता. तर जिब्रान खानने 'कभी खुशी कभी गम'मध्ये शाहरुख खानच्या मुलाची भूमिका साकारली होती. याशिवाय 'रिश्ते' आणि 'क्यूंकी…मैं झुठ नहीं बोलता' मध्ये बालकलाकार म्हणूनही तो दिसला होता.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news