Nashik Bribe News | अवघ्या पाचशे रुपयांची लाच घेताना महिला शिपाई जाळ्यात | पुढारी

Nashik Bribe News | अवघ्या पाचशे रुपयांची लाच घेताना महिला शिपाई जाळ्यात

नाशिक : शहरातील विद्युत निरीक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या महिला शिपाई संशयित गीता हेमंत बोकडे (४५,रा. अशोकामार्ग) यांनी पाचशे रूपयांची लाच घेतल्याचे उघडकीस आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (दि.१३) बोकडे यांना लाच घेताना रंगेहात पकडले.

एका तक्रारदार महिलेला विद्युत ठेकेदार व पर्यवेक्षक परवाना मिळण्याकरिता विद्युत निरीक्षक कार्यालयात अर्ज करायचा होता. बोकडे यांनी तक्रारदार महिलेला परवान्यासाठी लागणारी कागदपत्रे मिळवून देते, असे सांगून त्यांच्यावर प्रभाव टाकला. तसेच दीड हजार रूपयांची लाच मागितली. सापळ्यात अडकण्यापुर्वी एक हजार रूपये बोकडे यांनी तक्रारदार महिलेकडून स्वीकारले होते. सोमवारी उर्वरित पाचशे रूपये पंचांसमक्ष स्वीकारले असता त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरिक्षक गायत्री जाधव, हवालदार ज्योती शार्दूल, संदीप वणवे यांच्या पथकाने सायंकाळी कार्यालयाच्या आवारात रंगेहाथ ताब्यात घेतले. त्यांच्याविरूद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.

हेही वाचा –

Back to top button