Aanand L. Rai : हॅप्पी बर्थडे आनंद एल राय, जाणून घ्या त्यांचा सिनेप्रवास | पुढारी

Aanand L. Rai : हॅप्पी बर्थडे आनंद एल राय, जाणून घ्या त्यांचा सिनेप्रवास

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माते आनंद एल राय त्यांच्या अनोख्या कथाकथनाच्या शैलीसाठी ओळखले जातात. (Aanand L. Rai) २८ जून रोजी या म्हणजे आज या दिग्गज दिग्दर्शकांचा वाढदिवस साजरा करताना जरा त्यांच्या ” सिनेमॅटिक अनुभवा” बद्दल जाणून घेऊ या ! (Aanand L. Rai)

तनु वेड्स मनू

एक आनंददायी रोमँटिक कॉमेडी चित्रपट म्हणजे “तनु वेड्स मनू” ! या चित्रपटाने आनंद एल राय यांची भारतीय चित्रपटसृष्टीतील एक दिग्दर्शक म्हणून नवीन ओळख संपादन केली. आर. माधवन आणि कंगना राणौत यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट एका अपारंपरिक प्रेमाच्या ट्रँगलबद्दलची खास गोष्ट सांगतो. विनोदी संवाद, हटके पात्र आणि आकर्षक गाणी आणि यामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला.

तनु वेड्स मनू: रिटर्न्स 

सुपरहिट ठरलेल्या पहिल्या चित्रपटानंतर “तनु वेड्स मनू”चा सिक्वेल आला आणि यातून अजून एका कथेने जन्म घेतला. आनंद एल राय यांनी पुन्हा एकदा तनु वेड्स मनू: रिटर्न्स च तितक्याच मनापासून आणि मनोरंजकपणे चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आणि या चित्रपटाचा दुसरा भाग देखील तितकाच प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या हृदयावर आणि बॉक्स ऑफिसवर राज्य केले.

न्यूटन 

न्यूटनने केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही एक वेगळीच छाप पाडली. न्यूटनने ९० व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट श्रेणीसाठी भारतासाठी अधिकृतपने हा चित्रपट निवडला गेला होता.

तुंबाड

निर्माता या नात्याने आनंद एल राय यांनी तुंबाड हा अनोखा चित्रपट निर्माण केला. एक हॉरर कथा प्रेक्षकांना दिली. राही अनिल बर्वे दिग्दर्शित हा चित्रपट एका वेगळ्या उंचीवर गेला यात शंका नाही. मनमोहक कथा असलेल्या या चित्रपटाला समीक्षकांची प्रशंसा मिळाली आणि याच अनोखं कौतुक झालं.

रांझणा

आनंद एल राय दिग्दर्शित असलेला हा मास्टर पिस सिनेमा! वाराणसीमधील एक मार्मिक प्रेमकथा दाखवताना आनंद एल राय यांनी या चित्रपटात साऊथ सुपरस्टार धनुषला मुख्य भूमिकेसाठी घेतलं होत. सोबतीला सोनम कपूर देखील या चित्रपटात दिसते. भावपूर्ण संगीत, दमदार परफॉर्मन्स आणि बारीकसारीक कथाकथनाने या सिनेमाने देशभरातील प्रेक्षकांना आपलंसं करून घेतलं.

अतरंगी रे

आनंद एल राय दिग्दर्शित अतरंगी रेमध्ये धनुष, सारा अली खान आणि अक्षय कुमार यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. हा एक छान रोमँटिक ड्रामा ठरला. मनमोहक कथा आणि आनंद एल राय यांच्या कथाकथनाची अनोखी पद्धत दोघांचा मेळ असलेला अतरंगी रेने जगभरातील सिनेप्रेमींची मने जिंकली.

रक्षाबंधन 

आनंद एल राय यांच्या २०२२ मध्ये आलेल्या रक्षाबंधन चित्रपटाने भावंडांमधील नाती खूप सुंदरपणे दाखवली. अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला कौटुंबिक विनोदी-नाटक, भावाचे बहिणींवरील अनोखं प्रेम या भोवती ही कथा फिरते. आनंद एल राय यांच्या दिग्दर्शनाच्या चातुर्याने आणि आकर्षक कथेने रक्षाबंधन या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात अनोखं स्थान निर्माण केलं.
दिग्दर्शन आणि निर्माते आनंद एल राय यांच्या चित्रपटाचा प्रवास उल्लेखनीय आहे. लवकरच धनुष-स्टारर “तेरे इश्क में” हा नवाकोरा चित्रपट देखील भेटीला येणार आहे. झिम्मा २ आणि हसीन दिलरुबा, फिर आयी हसीन दिलरुबाचा सिक्वेल देखील येणार असल्याचं समजतंय! येणाऱ्या काळात आनंद एल राय चित्रपटाची अनोखी मेजवानी देणार आहेत यात शंका नाही.

Back to top button