अदिती राव हैदरीने पटकावला ट्रेलब्लेझर परफॉर्मर ऑफ द इयरचा पुरस्कार | पुढारी

अदिती राव हैदरीने पटकावला ट्रेलब्लेझर परफॉर्मर ऑफ द इयरचा पुरस्कार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पीरियड ड्रामाची राणी म्हणून गौरवल्या जाणाऱ्या अभिनेत्री अदिती राव हैदरीने “ज्युबिली”मधील तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार पटकावला आहे. प्रतिष्ठित ट्रेलब्लेझर परफॉर्मर ऑफ द इयर हा पुरस्कार तिने जिंकला आहे. मनोरंजन इंडस्ट्रीत प्रतिभावान अभिनेत्री म्हणून अदितीला ओळखलं जातं.

“ज्युबिली” हा एक अफलातून सिनेमॅटिक अनुभव असून त्याचा कथेने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. अदिती राव हैदरी हिने “सुमित्रा कुमारी” हे पात्र अनोख्या तऱ्हेने साकारले आहे. तिने या चित्रपटातील भूमिकेला चारचाँद लावले आहेत.

ही अभिनेत्री संजय लीला भन्साळीच्या हीरा मंडीमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे आणि चाहते तिला पुन्हा मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी उत्सुक आहेत.

Back to top button