Marathi Movie : एक बेभान प्रेमकथा ‘झिंगाड’ यादिवशी होणार प्रदर्शित | पुढारी

Marathi Movie : एक बेभान प्रेमकथा 'झिंगाड' यादिवशी होणार प्रदर्शित

पुढारी ऑनलाईन डेस्क : आकांक्षा चित्र प्रस्तुत आणि रणजित भिसे निर्मित, आनंद शिशुपाळ दिग्दर्शित झिंगाड हा मराठी चित्रपट येत आहे. १८ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. झिंगाडच्या निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केलं आहे. प्रतिभावान अभिनेत्री लाजरी देशमुख आणि शाहरुख शेख ‘झिंगाड’ या आगामी मराठी चित्रपटात झळकणार आहे.

कौटुंबिक नाट्य असलेल्या या चित्रपटात एक बेभान प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे. त्यांचं प्रेम फुलणार की त्यात अडचणी येणार हे जाणून घेण्यासाठी आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल.

या चित्रपटाचे निर्माते रणजित भिसे झिंगाड ‘बाबत म्हणाले की, आजच्या तरुणाईला आवडेल अशी ही कथा आहे. या कथेद्वारे लोकांना निश्चितच प्रेम, एकतेचा संदेश मिळेल. अगदी निखळ मनोरंजन करणारा हा चित्रपट आहे. प्रेक्षकांनी नक्की थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट जरूर पाहावा.

दिग्दर्शक आनंद शिशुपाळ म्हणाले की,मी या चित्रपटाबाबत खूपच उत्सुक आहे. नाट्यमय वळणांची ही खूप गोड, लव्ह बर्ड स्टोरी आहे. मला खात्री आहे की प्रेक्षकही चित्रपट पाहिल्यानंतर आकर्षित होतील. मी देखील चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे.

चित्रपटाची कथा आणि निर्मिती रणजित भिसे यांची आहे. आनंद शिशुपाळ दिग्दर्शित या चित्रपटात लाजरी देशमुख, शाहरुख शेख, वैशाली तिवडे, मेहबूब मुल्ला, विनायक बेडके, कृष्णा पाटील, अक्षय कोठारी आदी कलाकार झळकणार आहेत.

Back to top button