मलायका अरोरा मनाने युरोपमध्येच ! | पुढारी

मलायका अरोरा मनाने युरोपमध्येच !

पुढारी ऑनलाईन : मलाइका अरोरा, बोनी व अर्जुन कपूर नुकतेच युरोप टूर करून मायदेशी परतले आहेत. बर्लिन, सॅल्झबर्ग व फ्रैंकफर्टला त्यांनी या दौऱ्यात भेट दिली. याच दौऱ्यात टिपलेली काही छायाचित्रे मलायकाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली असून अर्जुन आता आपला फेवरीट फोटोग्राफर बनतो आहे, अशी टिपणी तिने यावेळी केली.

मलाईकाने युरोप दौऱ्यात ग्राफिटी वॉलनजीक पोझ दिलेले छायाचित्र शेअर केले असून फॅशनचे पैलूही यात उलगडून दाखवले आहेत. अर्जुनसाठी बोनी कपूर या आपल्या पित्यासमवेत हा पहिलाच दौरा होता. त्यांनी हॅन्स झिम्मर कॉन्सर्टलादेखील हजेरी लावली.
अर्जुननेदेखील आपल्या सोशल अकाऊंटस्वर हॅन्स झिम्मर लाईव्हचे करावे तितके कौतुक कमीच असल्याचे यावेळी सांगितले. माझ्यासाठी ही एका अर्थाने स्वप्नपूर्ती होती. कॉन्सर्ट माझ्यासाठी अतिशय भावनिक करणारा आणि प्रेरणा देणाराही होता, असे तो येथे म्हणाला.

Back to top button