तापसी पन्नू – मला त्यांनी एवढे महत्त्व दिले… | पुढारी

तापसी पन्नू - मला त्यांनी एवढे महत्त्व दिले...

तापसी पन्नू ही बॉलीवूडमधील ही आघाडीची अभिनेत्री आहे. तापसी नेहमीच चर्चेत असते. आता लवकरच ती शाहरूख खानबरोबर रोमान्स करताना दिसणार आहे. नुकतेच तापसीने एका मुलाखतीत अमिताभ बच्चन आणि शाहरूख खान या दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. या दोघांबरोबर काम करताना नेमकं कसे तयार राहावे लागते, तसेच या दोघांबरोबर सहकलाकाराचे नाते कसे तयार होते याविषयी तापसी बोलली आहे. शाहरूखच्या घरी पहिल्यांदा पार्टीला गेल्याचा एक धमाल किस्सादेखील तापसीने शेअर केला आहे. शाहरूखच्या वाढदिवसाच्या पार्टीनिमित्त तापसीला आमंत्रण होते. याबाबत ती म्हणाली, मी आणि माझी बहीण तयार होऊन शाहरूखच्या घरी पार्टीसाठी गेलो, शाहरूखच्या मॅनेजरनी आम्ही आल्याचे त्यांना सांगितले. शाहरूखने आम्हाला पाहिले आणि पाहुण्यांना माझी ओळख करून देत ते म्हणाले, ही आहे आमच्या देशातील एक उत्कृष्ट अभिनेत्री, त्यांच्या अशा बोलण्यामुळे मी गोंधळलेच! त्यावेळी शाहरूख म्हणले,आता तू माझी फजिती करू नकोस, मी तुझ्याबद्दलच बोललो आहे. अशा पद्धतीने त्यांनी मला एवढे महत्त्व दिले आणि पार्टी संपल्यावर ते मला माझ्या मोटारीपर्यंत सोडायला आले.

Back to top button