प्रेमाच्या भावना समजून घ्याव्यात! | पुढारी

प्रेमाच्या भावना समजून घ्याव्यात!

बॉलीवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर सध्या त्याच्या ‘द नाईट मॅनेजर’ वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. आदित्यने गेल्या आठवड्यात या वेब सीरिजच्या मुंबईतील स्पेशल स्क्रीनिंगसाठी हजेरी लावली होती. यावेळी एका चाहतीने त्याला जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न केला होता. आदित्यचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर नेटकर्‍यांनी त्या चाहतीला ट्रोल केले होते. यावर आदित्य म्हणाला, ‘खरे सांगायचे तर त्या संपूर्ण प्रकरणामुळे मी अजिबात आश्चर्यचकित किंवा निराश झालो नाही. ती चाहती फारच स्ट्राँग होती. पण, मला ती परिस्थिती हाताळावी लागली. मी तिच्या भावना समजू शकतो. मी तिच्यावर टीकाही करणार नाही किंवा ते चुकीचे होते, असेही म्हणणार नाही. माझ्याप्रती वाटणार्‍या आपुलकी आणि प्रेमाच्या त्या भावना होत्या, तिच्या भावना तिने अशाप्रकारे व्यक्त केल्या. तेव्हा परिस्थिती योग्यप्रकारे हाताळली पाहिजे, पण मी या संपूर्ण प्रकरणाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिले नाही’, असेही आदित्य म्हणाला.

Back to top button