Dream Girl 2 : Ayushmann Khurrana च्या ड्रीम गर्ल-२ ची रिलीज डेट समोर | पुढारी

Dream Girl 2 : Ayushmann Khurrana च्या ड्रीम गर्ल-२ ची रिलीज डेट समोर

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) चा चित्रपट ‘ड्रीम गर्ल’ (Dream Girl 2) च्या सीक्वलची घोषणा केलीय. प्रशंसक नेहमीच उत्साहित देखील असतात. आता चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. ७ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. ड्रीम गर्ल (Dream Girl 2) मध्ये आयुष्मान (Ayushmann Khurrana) पूजा नावाचीतरुणी बनून पुरुषांना घायाळ करताना दिसला होता. आता पुढे काय स्टोरी असणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

व्हॅलेंटाईन डेच्या औचित्याने ड्रीम गर्ल सीक्वल आणि या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली होती. याचा एक नवा मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत चेहरा दिसत नाहीये. यामध्ये ड्रीम गर्ल पूजा दिसतेय. ती शाहरुख बनलेल्या पठानशी बोलत आहे. फोनच्य़ा दुसरीकडे शाहरुख खानचा आवाज ऐकू येतो.

चित्रपट ड्रीम गर्लच्या सीक्वलमध्ये आयुष्मान खुरानासोबत अनन्या पांडे आहे. आधी पहिल्या भागात नुसरत भरुचा होती. ड्रीम गर्ल २ मध्ये असरानी, परेश रावल, विजय राज, राजपाल यादव, सीमा पाहवा, गोवर्धन असरानी, अभिषेक बॅनर्जी, मनजोत सिंह आणि मनोज जोशी असतील. ‘ड्रीम गर्ल-2’ चित्रपट ७ जुलै रोजी रिलीज होईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

Back to top button