अल्‍पवयीन मुलीची स्‍मशानभूमीत पूजा, सुरूर येथील धक्‍कादायक प्रकार | पुढारी

अल्‍पवयीन मुलीची स्‍मशानभूमीत पूजा, सुरूर येथील धक्‍कादायक प्रकार

सातारा; पुढारी वृत्तसेवा : साताऱ्यातील सुरूर येथे अल्‍पवयीन मुलीची स्‍मशानभूमीत पूजा केल्‍याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. स्मशानभूमीच्या कट्ट्यावर मुलीच्या मांडीवर कोंबडा देऊन मांत्रिकाने पूजन केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्‍याने हा प्रकार उघड झाला. अल्‍पवयीन मुलीची स्‍मशानभूमीत पूजा केल्‍याचा प्रकार युवकांच्या निदर्शनास येताच मांत्रिकासह अल्पवयीन मुलगी तसेच नातेवाईक बेपत्ता झाले आहेत.

या व्हायरल व्हिडिओमुळे अंधश्रध्देचा प्रकार समोर आला आहे. या व्हिडिओ मध्ये अल्‍पवयीन मुलीची स्‍मशानभूमीतील पूजेवेळी मुलीच्या मांडीवर कोंबडा देवून तीला कुंकवाने काढलेल्‍या वर्तुळात बसवल्‍याचे दिसत आहे. तिच्या समोर बसलेला मांत्रिकाने मुलीसमोर लिंबु, अंडे, नारळ आदी साहित्‍य मांडून बसल्‍याचे दिसून येते आहे.

हा धक्‍कादायक प्रकार वाई तालुक्‍यातील सुरूर गावाच्या स्‍मशानभूमीत घडली आहे.

अल्पवयीन मुलीच्या स्मशानभूमीत पुजनामुळे चर्चेला उधाण आले आहे.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्‍यानंतर मांत्रीक अल्‍पवयीन मुलगी तसेच तिचे कुटुंबिय बेपत्‍ता झाले आहेत.

हेही वाचलं का ? 

 

Back to top button