Sidharth Malhotra : सिद्धार्थ-रश्मिकाच्या ‘मिशन मजनू’चा ट्रेलर रिलीज | पुढारी

Sidharth Malhotra : सिद्धार्थ-रश्मिकाच्या ‘मिशन मजनू’चा ट्रेलर रिलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​( Sidharth Malhotra ) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा आगामी ‘मिशन मजनू’ लवकरच चाहत्याच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात सिद्धार्थने एका रॉ एजेंटची भूमिका साकारली आहे. सिद्धार्थ पाकिस्तानमध्ये गुप्त माहिती मिळवण्यास जातो आणि तिथेच त्याला रश्मिकावर प्रेम जडतं हे दाखविले आहे. या चित्रपटातील काही दिवसापूर्वी ‘रब्बा जाणता’ हे गाणं रिलीज करण्यात आलं होतं. आता या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​( Sidharth Malhotra ) च्या इंन्स्टाग्रावर आगामी ‘मिशन मजनू’ चित्रपटातील २ मिनिटे ३० सेकंदाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. यात पहिल्यांदा सिद्धार्थ पाकिस्तानमध्ये गुप्त माहिती मिळवण्यास जातो, तेथे तो शिंपी बनतो आणि यानंतर त्याला डोळ्याना न दिसणाऱ्या मुलीवर प्रेम होते. यानंतर तो तिच्यासोबत लग्न करतो. यासोबत तो गुप्त मिशनची माहितीदेखील भारत सरकारपर्यत पोहोचवत असतो. यात पाकिस्तान न्यूक्लियर बॉम्ब कोठे बनवत आहे याची माहिती तो मिळवत असतो. याशिवाय तो बॉम्ब निकामी करण्याचेही काम तोच करत असतो. असे या चित्रपटातील ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे.

चित्रपटात सिद्धार्थने रॉ एजेंटची तर रश्मिकाने पाकिस्तानी महिलेची मुख्य भूमिका साकारली आहे. सिद्धार्थ आणि रश्मिकासोबत या चित्रपटात कुमुद मिश्रा, शारिब हाशमी आणि रजित कपूर हो स्टार्स आहेत. या चित्रपटात सिद्धार्थ स्वत: ची ओळख लपवण्यासाठी या महिलेशी लग्न करतो असे दाखविले आहे. हा चित्रपटात अभिनयासोबत भरपूर अॅक्शन ड्रामा भरला आहे. ‘मिशन मजनू’ हा चित्रपट नेटफ्लिक्सच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर २० जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

Back to top button