तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं : ऐश्वर्या म्हैस आहे की मुलगी? - पुढारी

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं : ऐश्वर्या म्हैस आहे की मुलगी?

पुढारी ऑनलाईन : झी मराठीवरील प्रेक्षकांची लोकप्रिय आणि कायम लक्षात राहील. अशी व्यक्तिरेखा म्हणजे राणा दा. हा राणा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आता सिद्धार्थ देशमुख या नव्या व्यक्तिरेखेसह तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली असली तरी प्रेक्षकांचा या मालिकेला भरघोस प्रतिसाद मिळतोय. विशेष म्हणजे, नुकतंच मालिकेत ऐश्वर्या म्हणजेच देशमुख घरातील म्हशीचं बाळंतपण प्रेक्षकांनी पाहिलं. ती बाळंत होणार. म्हणून घरातील सगळेचजण काळजीत असतात. प्रत्येकाची सुरु असलेली धावपळ बघून ऐश्वर्या म्हैस आहे की मुलगी यात अदितीचा गोंधळ होतो.

हार्दिक जोशी-अमृता पवार
हार्दिक जोशी-अमृता पवार

सध्या एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत आहे. विभक्त कुटुंब पद्धती फोफावत असताना पुन्हा एकत्र कुटुंबपद्धतीला नवसंजीवनी देणारी ही मालिका आहे.

मालिकेतील एकत्र कुटुंब पद्धती आणि एकंदरतीच देशमुख कुटुंबातील सदस्यांची एकमेकांबद्दलच नाही तर त्यांच्याकडील पशु-पक्षांबद्दल देखील असलेली आत्मीयता प्रेक्षकांना भावली.

कधीही एकत्र कुटुंब पध्दतीचा अनुभव नसणारी आदिती (अमृता पवार) या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे.  देशमुख घरातील म्हशीचं बाळंतपण प्रेक्षकांनी पाहिलं. ती बाळंत होणार, म्हणून घरातील सगळेचजण काळजीत असतात. प्रत्येकाची सुरु असलेली धावपळ बघून ती नेमकी म्हैस आहे की मुलगी यात अदितीचा गोंधळ होतो.

दिवसाअंती म्हैस व्याली  आणि सगळे टेन्शन फ्री होतात. त्यामुळे देशमुख कुटुंब हे फक्त माणसांपुरती मर्यादित नसून त्या घरातील पशु-पक्षी देखील त्यांचं कुटुंबच आहे. असं सिद्धार्थ अदितीला सांगतो.

हा प्रसंग अगदी मनाला भावणारा होता. मालिकेतील याच वेगळेपणामुळे प्रेक्षकांनी या मालिकेला डोक्यावर उचलून धरलं आहे. सिद्धार्थ आणि अदिती सोबत घरातील प्रत्येक व्यक्ती ही प्रेक्षकांना आपलीशी आणि आपल्यातलीच एक वाटतेय.

प्रेक्षकांचा मालिकेला मिळणार उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हे पाहून अदिती म्हणजे अभिनेत्री अमृता पवार म्हणाली- प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंबा पाहून आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद होतो आहे.

त्यांची उस्फूर्त प्रतिक्रिया हीच आमच्या कामाची पावती आहे. या मालिकेसारखं वातावरण खूप कमी बघायला मिळतं. अदितीला माणसांबद्दल भीती असणं हा गुण वास्तवातही कुठे ना कुठे पहायला मिळतो. माणसं आपल्या आपल्यातच इतकी रमतात. की, छोट्या कुटुंबातही त्यांचं एकमेकांकडं लक्ष नसतं. एकमेकांशी कम्युनिकेशनच नसतं.

मोठ्या कुटुंबात न राहून आपण नक्की काय मिस करतोय. हे आजच्या जनरेशनला या मालिकेच्या माध्यमातून समजतंय. मोबाईल आणि कॅाम्प्युटरच्या पलिकडे जाऊन माणसांचंही एक जग असतं हे युथला समजतंय. त्यात काय सुख असतं हे प्रेक्षकांना जाणवतंय.

देशमुख कुटुंबियांना भेटायला विसरू नका ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

अमृता पवारविषयी जाणून घ्या ‘या’ गोष्टी…

अमृताने जिजामाता या मालिकेत अभिनय साकारला होता. अल्पावधीतचं ती मालिका लोकप्रिय ठरली होती. याआधी अमृताने स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेमध्ये काम केले आहे. त्यानंतर ती ललित २०५ या मालिकेत अभिनेता संग्राम साळवी सोबत दिसली होती.

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं : अमृता पवार म्हणते-लग्न केल्यावर…

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवंमधील अमृता पवारविषयी जाणून घ्या

तिने ललित २०५ मध्ये भैरवी भूमिका साकारली होती. तिने स्टार प्रवाहवरील दुहेरी या मालिकेतून टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. अमृता पवारचा जन्म १५ डिसेंबर, १९८८ रोजी मुंबईमध्ये झाला. तिने शालेय शिक्षण पार्ले टिळक विद्यालय, विले पार्ले येथून घेतले.

तर आर. ए. पोदार कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स (बीकॉम) मधून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. तिला सीए व्हायचे होते. पण, नंतर तिने अभिनयात यायचे ठरवले.

हेही वाचलं का ? 

Back to top button