‘घागर घुमू दे घुमू दे’; प्राजक्ता गायकवाड हिचा खास व्हिडिओ व्हायरल

मुंबई; पुढारी ऑनलाईन : ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड सध्या सोशल मीडियावर एका व्हिडिओमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

म्हणजे प्राजक्ता गायकवाड हिचा घागर घुमूदे घुमूदे या सुंदर गाण्यावर नृत्य करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सध्या घरोघरी गौरी गणपतीचे आगमन झालं आहे. गणपती बाप्पाच्या स्थापने नंतर दोन दिवसांनी गौरी उत्सव साजरा करण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा प्राजक्ताने जपली आहे.

प्राजक्ताच्या घरी देखील गौराईंचं पूजन करण्यात आले. याचा एक खास व्हिडीओ तिने सोशल मिडीयावर शेअर केला आहे. तिने सुंदर नृत्य करत गौरींची पूजा केली आहे.

‘घागर घुमूदे घुमूदे’ या सुंदर गाण्यावर ती नृत्य करताना दिसते. तिचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.


समृद्धी व मांगल्यांचे प्रतिक समजल्या जाणा-या महालक्ष्मी अर्थात गौरीचा उत्सव राज्यभरात साजरा केला जातो. यापूर्वी तिने गौरी आगमनावेळी गौराईंना सजवतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतरचा तिचा हा व्हिडीओ फारच चर्चेत येत आहे.

प्राजक्ताने ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत प्राजक्ताने महाराणी येसूबाई ही भूमिका साकारली होती.

उत्तम अभिनयशैली आणि गोजिरवाणा चेहरा यांच्या जोरावर प्राजक्ता आज विशेष लोकप्रिय आहे.

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या प्राजक्ताचा फॅन फॉलोइंगसुद्धा मोठा आहे. रोजच्या जीवनातील विविध घडामोडी प्राजक्ता चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Back to top button