जॅकलीन फर्नांडिसची योलो फाउंडेशनसोबत किन्नर ट्रस्टला भेट | पुढारी

जॅकलीन फर्नांडिसची योलो फाउंडेशनसोबत किन्नर ट्रस्टला भेट

पुढारी ऑनलाईन : जॅकलीन फर्नांडिसची योलो फाउंडेशनसोबत किन्नर ट्रस्टला भेट दिली. जॅकलीन फर्नांडीसने आपल्या योलो फाउंडेशनच्या माध्यमातून समाजात सकारात्मक कार्य केले आहे. या गणेशोत्सवात किन्नर ट्रस्टसोबत स्वतःला जोडून घेण्याचा निर्णय घेतला. या बुद्धिदेवतेच्या चरणी लीन होत तिने किन्नर ट्रस्टला भेट दिली.

जॅकलीनने आपल्या सोशल मीडियावर शेयर करताना लिहिले, “Ganpati Bappa Morya!!! Right now, all the gullys are echoing with this sound. Wherever I go, I see smiles that Lord Ganesha has bestowed upon us. On this auspicious occasion I along with @jf.yolofoundation visited @kinnartrust to be a part of their celebration. May Lord Ganesha continue to bless this beautiful community ❤️❤️ #yolo #ganpati #ganesha #transgender #happiness #life #celebration #love #unity #spreadpositivity”

अभिनेत्रीने आपल्या योलो फाउंडेशनच्या माध्यमातून समाजासाठी चांगल्या तऱ्हेचे काम केले आहे. या पॅंडेमीकमध्ये गरजूंसाठी अन्न दान केले. भटक्या कुत्र्यांची मदत तसेच, पोलिसांना मास्क, सॅनिटायझर्स इत्यादींचे वाटप करण्यात ती आघाडीवर होती.

या काळात आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे हे समाजोपयोगी काम पहात आलो आहोत. मात्र जॅकलीन खूप आधीपासूनच हे अथकपणे करत आली आहे.

वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाल्यास सर्कस, बच्चन पांडे, किक २ आणि रामसेतु यांसारखे बिग बजेट चित्रपट तिच्याकडे आहेत.

 

 

Back to top button