Manike Mage Hithe; व्हायरल होणाऱ्या या गाण्याचा अर्थ आहे तरी काय?

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन: सोशल मीडियावर सध्या Manike Mage Hithe या व्हायरल होणाऱ्या गाण्याला सर्वांनी डोक्यावर घेतलं आहे. सर्वसामन्यांपासून ते सेलेब्सपर्यंत सर्वांनी या गाण्यावर रील्स बनवत गाण्याच्या तालावर नाचण्याचा मोह अवरलेला नाही.

Manike Mage Hithe व्हायरल झालेल्या गाण्याचा अर्थ समजला नसला तरी हे गाणं लोकांच्या चांगलच पसंतीस उतरल आहे. माधुरी दीक्षितपासून प्रिया बापटपर्यंत अनेकांना यावर Insta Reel करण्याचा मोह आवरला नाही.

कुठून आलं हे गाणं? कुठल्या भाषेतलं आहे? कुणी गायलंय? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असले तरी या गाण्याच्या तालावर अनेकांचे पाय आपोआप थिरकताना दिसतात.

Manike Mage Hithe; व्हायरल होणाऱ्या या गाण्याचा अर्थ आहे तरी काय?

मनिके मागे हिथे हे गाणं दाक्षिणात्य भाषेतले वाटत असलं तरी ते कुठल्याही भारतीय भाषेतले नाही. ते आहे श्रीलंकन गाणं सिंहली भाषेतलं आहे. असे समजले आहे.

योहानी आणि सतीशन यांनी गायलेल्या या गाण्याने YouTube वर कमीत कमी वेळेत 100 Million views मिळवून विक्रम केला.
मूळ सिंहली भाषेतलं गाणं २०२० मध्ये रीलीज झाले होते.

श्रीलंकन रॅपन आणि गायिका योहानी डीसिल्व्हा हिने सिंहली भाषेतच मे २०२१ मध्ये पुन्हा गायले.

अवघ्या काही महिन्यात ते भारतात हिट झाले.सध्या जगभर गाजत आहे.

योहानी आणि सतीशन या दोन गायकांनी या गाण्याचं आणखी एक व्हर्जन गायले.

सध्या याच गाण्याची तमीळ, मल्याळी, तेलुगू आणि हिंदी व्हर्जन्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

पहिल्या ओळींचा काय आहे अर्थ?

Ruwa Nari Manamali Sukumali Numba Thama याचा अर्थ, तू माझ्या मनात ठसली आहेस. तुझा विचार आला तरी हृदयाला आग लागते. तुझ्यावरून नजर हटत नाही. तू शतजन्मापासून मला परिचित असल्यासारखं वाटतेस, इतके तुझेच विचार सतत मनात असतात.

तर You look like a goddess. My mind is exhilarating. You are the dearest. म्हणजे तू एखाद्या देवतेसारखी मनात ठाण मांडून बसली आहेस. माझ्या अगदी जवळ आहेस आणि माझं प्रेम फक्त तुझ्यासाठी राखून ठेवलं आहे.
असा अर्थ पहिल्या ओळींचा आहे.

 

 

Back to top button