ram kapoor and goutami
ram kapoor and goutami

राम कपूर आणि गौतमीचा ‘तो’ फोटो झाला व्हायरल अन्

Published on

पुढारी ऑनलाईन : महागड्‍या अभिनेत्‍यांच्‍या यादीत राम कपूर या टीव्‍ही अभिनेत्याचं नाव घेतलं जातं. 'प्रत्‍येक भूमिकेला परफेक्‍ट' अशीच त्‍याची ख्‍याती आहे. 'बडे अच्छे लगते है' या मालिकेतून राम कपूरला रातोरात प्रसिध्‍दी मिळाली. त्याने अभिनेत्री गौतमीसोबत २००३ साली लग्नगाठ बांधली होती. आता इतक्या वर्षांनंतर त्यांचा हनीमूनचा एक फोटो व्हायरल होतोय.

गौतमीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

थ्रोबॅक फोटो

गौतमीने सोशल मीडियावर दोघांचा हनीमूनचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोंमध्ये दोघे समुद्र किनारी उभे आहेत. या फोटोमध्ये राम खूप फिट दिसत आहेत. राम या फोटोमध्ये शर्टलेस आणि गॉगल घालून उभा आहे.

तर गौतमी स्विमसूटमध्ये दिसत आहे. गौतमीने फोट शेअर करत लिहिलं आहे-हा फोटो २००३ चा आहे. पण, हा फोटो पाहून फॅन्स रामच्या फिटनेसचे कौतुक करत आहेत.

लव्‍हस्‍टोरी

दमदार अभिनय साकारणार्‍या कपूरची लव्‍ह स्‍टोरीही मजेदार आहे.

२००२ मध्‍ये कपूरने 'घर एक मंदिर' मालिका केली. याचदरम्‍यान, राम अभिनेत्री गौतमीला भेटला. 'घर एक मंदिर'मध्‍ये रामने राहुल आणि गौतमीने आंचलची भूमिका केली होती.

दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली. त्‍यांना शूटिंगदरम्‍यान एकमेकांशी प्रेम झालं आणि एका पार्टीत रामने गौतमीला थेट लग्‍नासाठी प्रपोज केलं होतं.

गौतमीनेही कसला विचार न करता पटकन होकार दिला होता.

दोघांचे कुटुंबीय लग्‍नासाठी तयार नव्‍हते. गौतमीचा हा दुसरा विवाह होता. प्रसिध्‍द फोटोग्राफर मधुर श्रॉफशी तिचं पहिलं लग्‍न झालं होतं. नंतर राम आणि गौतमीच्‍या कटुंबियांनी लग्‍नासाठी होकार दिला.

गौतमी महाराष्‍ट्रीयन आहे आणि तो पंजाबी आहे. खूप कमी लोकांना माहिती आहे की, गौतमीचं हे दुसरं लग्‍न आहे. काही वर्ष रिलेशनशीपमध्‍ये राहिल्‍यानंतर दोघांनी १४ फेब्रुवारी, २००३ मध्‍ये लग्‍न केलं. त्‍यांना दोन मुले आहेत. मुलगा अक्स आणि मुलगी सिया अशी त्‍यांची नावे आहेत.

दोन्‍ही कपल २०१४ मध्‍ये आलेला चित्रपट 'शादी के साईड इफेक्ट्स'मध्‍ये दिसले होते. त्याने रिॲलिटी शो 'जिंदगी के क्रॉसरोड्स' शोदेखील होस्ट केला आहे. त्‍याने अनेक चित्रपटांतून काम केलं आहे.

'हजारों ख्वाहिशें ऐसी,' 'कार्तिक कॉलिंग कार्तिक' आणि 'मेरे डॅड की मारुति' या चित्रपटांचा समावेश आहे. 'घर एक मंदिर,' 'बडे अच्छे लगते है' याशिवाय, 'रिश्ते,' 'कसम से,' 'क्योंकि सास भी कभी बहू थी' यांसारख्‍या मालिकांमध्‍ये त्याने दमदार भूमिका साकारल्‍या आहेत.

पहिला ब्रेक

कपूरला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. इयत्ता नववीत शिकत असताना त्‍याने पहिल्‍यांदा स्टेज शो मध्‍ये भाग घेतला होता. त्याने पदवीचे शिक्षण घेतल्‍यानंतर थेट दिल्ली गाठली. तेथे थिएटरमध्‍ये काम केलं.

अधिकतर इंग्रजी नाटके केली. त्‍याला पहिला ब्रेक मिळाला तो दूरदर्शनवरील 'न्याय' या शोतून. नंतर त्‍याला आणखी दोन 'हीना' आणि 'संघर्ष' मालिका मिळाल्‍या. बालाजी टेलीफिल्म्सने त्याला मोठा ब्रेक दिला.

करियर

त्याने टीव्ही सीरियल क्योंकि सास भी कभी बहू थी, दिल की बातें दिल ही जानें, कसम से, बड़े अच्छे लगते हैं यासारख्या मालिकांमध्ये काम केलंय. या मालिकांनी त्याला घराघारत ओळख करून दिली.

त्याचबरोबर, त्याने बॉलीवूड चित्रपट स्टूडेंट ऑफ द ईयर, बार-बार देखो, कार्तिक कॉलिंग कार्तिक, शादी के साइड इफेक्ट्स यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय.

रामने दिले होते बोल्‍ड सीन 

राम -साक्षी तंवर यांच्‍यादरम्‍यान, १७ मिनिटे सर्वांत लांब इंटीमेट सीन चित्रीत करण्‍यात आलं होतं. दोन्‍ही कलाकारांनी किसिंग सीनला काही रीटेकमध्‍येच फायनल केलं होतं.

लिप लॉक सीननंतर दोघांनाही नंतर विचित्र वाटत असल्‍याचे वृत्त तेव्‍हा समोर आलं होतं. बोल्‍ड सीनमुळे मालिकेचा टीआरपीही चांगलाच वाढला होता. राम-साक्षीची केमिस्‍ट्री प्रेक्षकांनाही आवडली होती. त्याने या मालिकेत एका उद्‍योगपतीची भूमिका केली होती.

या सीननंतर अनेक वर्षांनी दोघांनीही पुन्‍हा किसींग सीन दिला. हा सीन एक वेब सीरीज 'कर ले तू भी मोहब्बत सीजन-२'साठी दिला होता.

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news