मुंबई-पुणे हायवेवर मानसी नाईकचा वेगळा अंदाज, लोक म्हणाले...

पुढारी ऑनलाईन : मानसी नाईकचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. मराठमोळ्या मानसी नाईक सातत्याने काही ना काही फोटोज व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने अनेकदा रिल्सदेखील केले आहेत. ती उत्तम नृत्यांगनाही आहे. तिचा अभिनयदेखील प्रेक्षकांना आवडतो. प्रत्येक फोटोत आणि व्हिडिओत तिचा हटके अंदाज असतो. आता तिने नवे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

वेस्टर्न असो किंवा ट्रेडिशनल तिचा प्रत्येक अंदाज खास असतो. आपले हटके फोटोशूट करत ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. आता तिने काही फोटो शेअर केले आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर उतरून तिने फोटोशूट केले आहेत. मस्त अंदाजात तिने स्काय ब्ल्यू कलरच्या साडीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

तिने या फोटोंना कॅप्शनमध्ये कविता लिहिलीय-

पाऊस म्हणजे
उल्हास मनी दाटलेला,
निसर्गाच्या सानिध्यात
मन वेडा फुललेला।
पाऊस म्हणजे
चौफेरे दाटलेली हिरवळ,
क्षणात दूर करते
मनात आलेली मरगळ।
पाऊस म्हणजे
उत्साह शरीरात दाटलेला,
रखडलेली कामे करण्यास
बोनस वेळ मिळालेला।
पाऊस म्हणजे
उगाच सुट्टी मिळालेली,
विसरून चिंता कामाची
कुटूंबासोबत घालवलेली।
पाऊस म्हणजे
शब्दांची सरच बरसते,
खोलवर मनात रूतलेली
सहजच कविता खुलते..🌦

दुसऱ्या फोटोजना तिने अशी कॅप्शन लिहिलीय की-

प्रामाणिकपणा हि शिकवण्याची बाब नाही,
तर तो रक्तातच असावा लागतो,
त्यात टक्केवारी नसते ,
तो असतो किंवा नसतो.
कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही.
शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.
“यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इछा अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे”.

ही अभिनेत्री तिचा बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्नबेडीत अडकली आहे.

ती ढोलकीच्या तालावर, मराठी तारका, हॅलो बोल यांसारख्या अनेक मराठी रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी झाली आहे.

आपल्या डान्सचे जलवे दाखवताना तिने अनेकांच्या मनावर रुंजी घातली आहे. लग्नानंतर तिने तिचा पती प्रदीपसोबत कपल फोटोशूट केले आहे. त्याचबरोबर, कपल व्हिडिओदेखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तीन बायका फजिती ऐका, जबरदस्त, मर्डर मेस्त्री, कुटुंब, ढोलकी, हू तू तू, कोकणस्थ यांसारखे चित्रपट मानसीने केले आहेत.
मानसीचा पती हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. तो अभिनेता आणि मॉडेलही आहे. प्रदीपच्या इन्स्टावर त्याचे अनेक फोटो पाहायला मिळतात.

सुंदर पिच कलरच्या साडीत व्हिडिओ व्हायरल

तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केलाय. त्या व्हिडिओमध्ये ती पिच कलरच्या साडीत खूप सुंदर दिसत आहे. बॅकग्राऊंडला दबंग चित्रपटातील तूने तो पलभर मे चोरी किया रे जिया…हे गाणे वाजताना दिसत आहे. तिने हा व्हिडिओ अर्ध्या तासापूर्वी शेअर केलाय. (Chori Kiya Re Jiya)

Back to top button