

पुढारी ऑनलाईन : सैराटचा मुख्य अभिनेता परशा म्हणजेच आकाश ठोसर याचे आजही तितकेच फॅन्स आहेत. सैराट चित्रपट रिलीज झाला होता. आकाश ठोसर सैराट मधून घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने काही चित्रपट आणि वेब सीरीज केल्या. सैराटनंतर त्याने एफयू : फ्रेंडशीप अनलिमिटेड चित्रपट केला. पुढे लस्ट स्टोरीज ही वेब सीरीज केली. हिंदी वेबसीरिज लस्ट आणि १९६२ः द वॉर इन द हिल्समध्ये तो झळकला. पण, प्रत्येक चित्रपटात त्याचा वेगळा लूक पाहायला मिळाला. आता परशाला जर तुम्हाला पाहिलं तर तुम्ही हैराण व्हाल.
परशाने इन्स्टाग्रामवर काही फोटोज शेअर केले आहेत. इन्स्टाग्रामवर त्याने नवे फोटो अपलोड केले आहेत. हे फोटो पाहून तुम्हाला अजिबात विश्वास बसणार नाही. हा परशाचं आहे का? असा प्रश्न तुम्हाला नक्की पडणार.
या फोटोंना एकापेक्षा एक कमेंट्स मिळत आहेत. चाहत्यांनी त्याचं तोंडभरून कौतुक केलं आहे. एका फॅनने म्हटलंय-आता भाऊ काय एकत नाय. घेतोय बदला सैराट २ मध्ये. दुसऱ्या फॅनने लिहिलंय-भाई तूच, बॉलीवूड फिक्का आहे. मराठी. तर आणखी एका फॅनने लिहिलंय -करण जोहर ला आता पश्चाताप होणार की धडक मध्ये आकाश ला घेतलं असत तर हिट झाला असता picture.
हे फोटोज ब्लॅक ॲण्ड व्हाईट आहेत. एका फोटोला त्याने कॅप्शन लिहिलीय की-जस्ट मी. आणखी एका फोटोला त्याने कॅप्शन लिहिलीय-fearless.
आता तुम्ही म्हणाल, या वेगळ्या लूकमध्ये आहे तरी काय? तर आम्ही त्याचं असं उत्तर देऊ की, दीर्घकाळ फिटनेस ठेवून परशाने हा लूक मिळवला आहे. मध्यंतरी त्याने, फिटनेसचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. त्यावेळी सर्वांना असं वाटत होतं की, परशाचा पुन्हा नवा चित्रपट येतोय. त्यासाठीचं तो इतकी मेहनत घेतोय.
आता परशा नागराज मंजुळे च्या चित्रपटात दिसणार आहे. अमिताभ बच्चन स्टारर झुंड चित्रपटात तो दिसणार आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री रिंकू राजगुरूदेखील दिसणार आहे.