akshay Kumar : अक्षय कुमारची संपत्ती आणि लाईफस्टाईल माहितीय का?  | पुढारी

akshay Kumar : अक्षय कुमारची संपत्ती आणि लाईफस्टाईल माहितीय का? 

पुढारी ऑनलाईन डेस्क : बाॅलिवुडमधील आघाडीचा अभिनेता अक्षय कुमार (akshay Kumar) हा करोडो चाहत्यांच्या गळ्यातला ताईत आहे. उत्कृष्ट अभिनय आणि फिटनेसमुळे अक्षय कुमार खासकरून सर्वांना परिचित आहे. इतर अभिनेत्यांच्या तुलनेत वर्षभरात ४-५ चित्रपट करणारा हा एकमेवर अभिनेता आहे. त्याच्या लाईफ स्टाईलबद्दल बऱ्याचजणांना उत्सुकता असते. आज त्याच्या लाईफस्टाईलबद्दल जाणून घेऊ या…

akshay kumar

अक्षय कुमारचा दिनक्रम : आपल्या फिटनेटवर काटेकोरपणे अक्षय कुमार लक्ष देत असतो. तो दररोज सकाळी साडेसहा वाजता उठतो आणि रात्री ९ वाजता झोपी जातो. शुटिंगवर असेल तर, जास्तीत दिवसभरात शुटिंग आटपण्याचा प्रयत्न केला जातो. कारण, रुटीन मोडलं जाणार याची काळजी घेतो.

akshay kumar

अक्षयला आवडणारे पदार्थ : अक्षय कुमारला (akshay Kumar) घरचं जेवणच जास्त पसंत आहे. त्याचबरोबर तो गुजराती खाद्यपदार्थही आवडीने खातो. दररोज तो हेवी नाश्ता करतो म्हणजेच अंडी, पराठा आणि ज्यूस याचं तो सेवन करतो. दुपारच्या जेवणात अक्षय कुमार भाजी-भाकरी आणि डाळ भात खाणं पसंत करतो. रात्रीच्या जेवणाचा विचार केला तर, अक्षय रात्रीच्या जेवणात हलकं-फूलकं खातो. तसेच सूप पितो.

akshay kumar

अक्षयची सर्वाधिक कमाई : अक्षय कुमारच्या कमाईचा विचार केला तर, तो सर्वाधिक कमाई हा सिनेमे, ब्रॅंड अम्बेसिटर, जाहिरात आणि सोशल मीडियातून जास्त कमवतो. एकूण बाॅलिवुडचा विचार केला तर, हायेस्ट पेड एक्टरच्या लिस्टमध्ये वरच्या स्थानावर अक्षय आहे. तो आपल्या चित्रपटांचं शुटिंह खूप वेगाने संपवितो, त्यामुळेच अक्षय वर्षभराच ४-५ सिनेमा पूर्ण करतो.

akshay kumar

महागड्या कारच्या प्रेमात : अक्षयच्या पार्किंगमध्ये एकापेक्षा एक महागड्या चारचाकी आहेत. त्याच्या ५ कोटींची राॅल्स राॅयल्स फॅंटम, अडीक कोटींची रेंज रोव्हर वोग, साडे तीन करोड रुपयांची बेंटले काॅनिनेटस फ्लाईंग स्पूर, एक कोटींची पोर्श सिने आणि २८ लाखांची मर्सिडीज जीएलएस कार, अशा लग्जरी कार अक्षय कुमारकडे आहेत.

अक्षय कुमारची संपत्ती : आपल्या अफाट मेहनतीच्या जोरावर अक्षय कुमारने बालिवुडमध्ये प्रचंड यश संपादित केलं आहे. त्याच्या एकूण संपत्तीचा विचार केला अक्षय कुमारची २ हजार ४१४ करोड रुपयांच्या आसपास त्याची संपत्ती आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button