B’day Aditya Roy Kapur : आदित्यला व्हायचं होतं क्रिकेटर, भावंडंही आहेत अभिनेते | पुढारी

B'day Aditya Roy Kapur : आदित्यला व्हायचं होतं क्रिकेटर, भावंडंही आहेत अभिनेते

पुढारी ऑनलाईन डेस्क : १६ नोव्हेंबर, १९८५ रोजी मुंबईत जन्मलेल्या अभिनेता आदित्य रॉय कपूरबद्दल (B’day Aditya Roy Kapur) फार कमी लोकांना माहिती आहे की, त्याचे आजोबा चित्रपट निर्माता होते. आदित्यची आई सलोमी रॉय कपूर यांनीही ग्लॅमरच्या दुनियेत एकेकाळी काम केले आहे. त्यांनी देब बॅनर्जीसोबत ‘तू ही मेरी जिंदगी’ या चित्रपटातही काम केले होते. आदित्य रॉय कपूरचे आजोबा रघुपत रॉय कपूर १९४० च्या दशकात चित्रपटांची निर्मिती करायचे. आदित्यला तीन भाऊ आहेत. त्याचा मोठा भाऊ सिद्धार्थ रॉय कपूर (सिद्धार्थ रॉय कपूर) हा UTV मोशन पिक्चरचा सीईओ आहे, त्याने अभिनेत्री विद्या बालनशी लग्न केले आहे. त्याचा दुसरा भाऊ कुणाल रॉय कपूर देखील अभिनेता आहे. (B’day Aditya Roy Kapur )आज आदित्यचा वाढदिवस, यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी.

(photo – adityaroykapurmylife insta)

आदित्य रॉय कपूरने अभिनयाचा कोणताही कोर्स केलेला नाही. आदित्य ज्या शाळेत शिकला, तिथे त्याची आई शाळेतील नाटके दिग्दर्शित करायची. त्यामुळे अभिनयाचे बाळकडू आईकडून मिळाले. शालेय जीवनात आदित्यने ठरवंल होतं की, क्रिकेटर व्हायचं. पण नंतर त्याने आपला मार्ग बदलला. मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर त्याने चॅनल व्ही वर व्हीजे म्हणून काम करायला सुरुवात केली. पुढे त्याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला.

आदित्य रॉय कपूरने २००९ मध्ये रिलीज झालेल्या ‘लंडन ड्रीम्स’ या मल्टीस्टारर चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात त्याने अजय देवगण आणि सलमान खान यांसारख्या बड्या स्टार्ससोबत काम केले होते. त्यानंतर २०१० मध्ये त्याचा दुसरा चित्रपट आला. या चित्रपटाचे नाव होते ‘Action Replay’. यामध्ये त्याने अक्षय कुमार आणि ऐश्वर्या राय यांच्या मुलाची भूमिका केली होती. त्याच वर्षी ऋतिक रोशन आणि ऐश्वर्या राय यांचा ‘गुजारिश’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता. या चित्रपटांमुळे लोकांनी त्याची दखल घेतली, पण त्याला हवी तशी ओळख मिळाली नाही.

२०१३ हे वर्ष आदित्य रॉय कपूरसाठी खूप भाग्यवान ठरले होते. या वर्षी त्याचा सर्वात मोठा हिट चित्रपट ‘आशिकी २’ आला.हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. चित्रपटातील गाणी खूप गाजली. या चित्रपटात त्याची जोडी श्रद्धा कपूरसोबत होती, जी प्रेक्षकांना खूप आवडली होती.

‘आशिकी २’ चित्रपटानंतर आदित्यच्या अभिनय कारकिर्दीला नवी गती मिळाली. यानंतर त्याने ‘दावत-ए-इश्क’, ‘फितूर’, ‘डियर जिंदगी’, ‘ओके जानू’, ‘कलंक’, ‘सडक २’ आणि ‘मलंग’ सारखे चित्रपट केले. आदित्य रॉय कपूरला त्याच्या आगामी ‘ओम – द बॅटल विदीन’ या चित्रपटाकडून खूप आशा आहेत.

photo – adityaroykapurmylife insta

 

View this post on Instagram

 

A post shared by @adityaroykapur

 

View this post on Instagram

 

A post shared by @adityaroykapur

Back to top button