पुणे : अपहरण करून तरुणाचे गुप्तांग कापण्याचा प्रयत्न | पुढारी

पुणे : अपहरण करून तरुणाचे गुप्तांग कापण्याचा प्रयत्न

पुणे; पुढारी वृत्तसेवा : एका तरुणाचे अपहरण करून धारदार शस्त्राने त्याचे गुप्तांग कापण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराच्या पत्नीला अटक केली आहे. याबाबत रामटेकडी येथील एका 30 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. ही घटना शिंदेवाडी परिसरात शनिवारी (दि.12) घडली. तिच्यासह प्रियकर आणि इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी दिलेली माहिती अशी : फिर्यादी हा एका फायनान्स कंपनीत काम करतो, तर आरोपी महिलेचा एक बचत गट आहे. तिने काही दिवसांपूर्वी 40 हजारांच्या कर्जासाठी फिर्यादीच्या कंपनीकडे अर्ज केला होता. यानंतर फिर्यादीचा तिच्याशी संपर्क झाला. कर्ज मिळवून देण्याचा बहाणा करीत त्याने तिच्याशी ओळख वाढवली. यानंतर दोघांमध्ये व्हॉट्सअपवर चॅटिंग सुुरू झाले. ही बाब तिच्या प्रियकराला कळली.

त्याने तिचा मोबाईल घेऊन स्वत: आरोपी महिला चॅटिंग करीत आहे, असे काही दिवस भासवले. यानंतर 12 नोव्हेंबरला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्याला कात्रजच्या नवीन बोगद्याजवळील स्वामी नारायण मंदिर येथे बोलावून घेतले. तेथे त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.

यानंतर त्याला दुचाकीवरून कात्रज जुन्या बोगद्याजवळील शिंदेवाडी येथे नेले. तेथे तिघांनी धारदार शस्त्राने त्याचे गुप्तांग कापण्याचा प्रयत्न केला. त्याला जखमी अवस्थेत आरोपींनी दुचाकीवर बसवून कात्रज घाटातील एका हॉटेलसमोर सोडले. संबंधित तरुणाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.तपास पोलिस उपनिरीक्षक ए. आर. कर्चे करीत आहेत.

Back to top button