संतोष जुवेकरचे प्रेक्षकांशाही ‘३६ गुण’ जुळले! | पुढारी

संतोष जुवेकरचे प्रेक्षकांशाही '३६ गुण' जुळले!

पुढारी ऑनलाईन : अभिनेता संतोष जुवेकरचा ‘36 गुण’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. समीक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. ‘36 गुण’ जुळल्यामुळे चित्रपटाला प्रेक्षकांनीदेखील उत्तम प्रतिसाद दिला आहे.

ग्रह-तारे, पत्रिका, एका भेटीतच साताजन्माच्या गाठी बांधणे वगैरे याच्या पलीकडे जाऊन नव्या नात्याची सुरुवात करताना कुंडलीपेक्षा एकमेंकांची मनं, मतं जुळणं महत्त्वाचं असते. हा विचार या चित्रपटात मांडला आहे. संतोषने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चित्रपटातील फोटो शेअर करून लिहिले आहे. ‘हे प्रेम प्रेक्षकांनी गच्च भरलेले सिनेमा थिअटर पाहिला आणि ते आपल्या सिनेमासाठी असेल तर काय फील होतं ते नाही सांगू शकत मित्रांनो!’.

Back to top button