सारा अली खानशी ब्रेकअप, कार्तिक आर्यन सिंगल | पुढारी

सारा अली खानशी ब्रेकअप, कार्तिक आर्यन सिंगल

पुढारी ऑनलाईन ; बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन स्लो बट स्टेडी अशारितीने एक एक हिट देत पुढे चालला आहे. नेटफ्लिक्सवर आलेला त्याचा ‘धमाका’ फुसका होता. पण, ‘भूलभुलैया 2’ यशस्वी ठरल्याने कार्तिकचा भाव पुन्हा वाढला आहे. कार्तिकची फिमेल फॅन फॉलोविंगही मोठी आहे.

नुकत्याच एका मुलाखतीत कार्तिकने त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत माहिती दिली. अभिनेत्री सारा अली खानशी ब्रेकअप झाल्यापासून कार्तिक सिंगलच आहे. मी गेल्या सव्वा वर्षापासून सिंगल आहे. बाकी मला काही माहिती नाही. माझ्यासाठी माझे कामच माझी रिलेशनशिप आहे. भविष्यात सिंगलच राहीन असे नाही; पण सध्या सिंगलच आहे, असे कार्तिक म्हणाला.

करण जोहरच्या शोमध्ये साराने एकदा वडील सैफ अली खानसमोरच कार्तिक आर्यन हा क्रश असल्याचे सांगितले होते. तसेच कार्तिकला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर इम्तियाज अली दिग्दर्शित ‘लव्ह आज कल 2’मध्ये ही जोडी एकत्र दिसली होती. तेव्हा दोघांच्या रोमान्सच्या अफवा पसरल्या होत्या.

तथापि, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हे दोघे एकत्र राहिले नाहीत. कार्तिकने इन्स्टाग्रामवर साराला अनफॉलोही केल्याचे सांगण्यात आले. दोघांच्या कामाबाबत बोलायचे, तर कार्तिक आगामी काळात ‘शहजादा’, ‘कॅप्टन इंडिया’,‘सत्य प्रेम की कथा’ आणि ‘फे्रंडी’या चित्रपटांत दिसणार आहे. सारा विकी कौशलसोबत लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित चित्रपटात दिसणार आहे.

Back to top button