लागीरं झालं जी फेम शिवानी बावकरची येतेय नवी मालिका!

मुंबई; पुढारी ऑनलाईन : सोनी मराठी वाहिनीवर ‘कुसुम’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. नुकताच त्याचा प्रोमो पाहायला मिळाला. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री शिवानी बावकर या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री शिवानी बावकर ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने लागीरं झालं जी या मालिकेत ‘शीतली’ हे पात्र साकारले होते.

शिवानी बावकर

 

शीतली या व्यक्तिरेखेमुळे ती महाराष्ट्राच्या घराघरांत ओळखली जाते. सासर आणि महेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या मुलीच्या भूमिकेत शिवानी दिसणार आहे.

 

लोकलमध्ये तिची मैत्रीण तिला संध्याकाळी मिसळ पार्टी करण्याबद्दल विचारते. तेव्हा ‘बाबांना दवाखान्यात घेऊन जायचं आहे’. असं सांगते. त्यावर ‘अजूनही तूच करतेस त्या घरचं?’ असं तिची मैत्रीण विचारते.

त्यावर कुसुम तिला विचारते. ‘सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची गरज आहे का?’सर्वच मुलींच्या मनातला प्रश्न तिन यात बोलून दाखवला आहे. म्हणूनच कुसुम तुमच्या-आमच्यातली वाटते.

ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शिवानी बावकर

ग्लॅमरस शिवानी

लागीरं झालं जी, अल्टी पल्टी या मालिकांतून शिवानीला लोकप्रियता मिळवून दिली. सोशल मीडियावर तिचा चाहतावर्ग आहे. तिचा शिव ठाकरेसोबत अल्बमदेखील पाहायला मिळाला. लागीरं झालं जी मध्ये ती अभिनेता नितीश चव्हाणसोबत झळकली होती.

शिवानी फिटनेसबाबत आग्रही आहे. तिला फिटनेसरूटीन फॉलो करणाऱ्या अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी आणि प्रिया बापट या तीन अभिनेत्री आवडतात.

शिवानी इयत्ता सातवीपासून योग करत आहे. आता कार्डिओ, वेट ट्रेनिंगही घेते. मानसिक आरोग्यासाठी योग आणि ध्यानधारणा या गोष्टीला पर्याय नाही, असं ती म्हणते.

शिवानीने जर्मन भाषाही शिकली आहे. लागीरं झालं जी या मलिकेत गावरान बोली आत्मसात करणं तिच्यासाठी अधिक आव्हानात्मक होतं, असं तिनं मुलाखतीत सांगितलं होतं.

हेही वाचलं का ? 

 

Exit mobile version