सॅम बहादूर या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात | पुढारी

सॅम बहादूर या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता विकी कौशल ‘उरी’ आणि ‘सरदार उधम’ या चित्रपटांनंतर आणखी एका देशभक्तीपर चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचा बायोपिक असून त्याचे नाव ‘सॅम बहादूर’ असे आहे. माणेकशॉ यांना सॅम बहादूर म्हणूनही बोलावले जायचे. माणेकशॉ यांना चार दशकांत पाच युद्धांचा अनुभव आहे.

त्यांचे आयुष्य अत्यंत रोमांचक राहिले आहे. फिल्ड मार्शल पदावरील ते पहिले भारतीय होते. 1971 मध्ये त्यांच्या सैन्याच्या विजयामुळेच बांगलादेशची निर्मिती झाली. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करत आहे. हा चित्रपट 2023 मध्ये रीलिज होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना शेख या ‘दंगल गर्ल्स’देखील आहे.

बॉलिवूड अभिनेता विकी कौशलने त्याच्या आगामी ‘सॅम बहादूर’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. हा एक बायोपिक चित्रपट आहे. या चित्रपटाच्या शूटिंगची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या चित्रपटात विकी कौशलसोबत अभिनेत्री सान्या मल्होत्रा ​​आणि फातिमा सना शेख यांच्याही मुख्य भूमिका आहेत. विकी कौशल आणि सान्या मल्होत्रा ​​पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत. हा चित्रपट फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. ज्याच्या भूमिकेत विकी कौशल दिसणार आहे.

मेघना गुलजार या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर रॉनी स्क्रूवाला त्याची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाच्या शूटिंग सेटवरून विकी कौशलने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये चित्रपटातील सर्व कलाकार काम करताना दिसत आहेत. ज्येष्ठ कवी गुलजार यांचीही झलक व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. या चित्रपटात विकी कौशलच्या व्यक्तिरेखेची झलकही पाहायला मिळाली आहे.

अभिनेत्री फातिमा सना शेख म्हणते की, ‘आपल्या देशाच्या महान युद्ध नायकांपैकी एक असलेल्या सॅम माणेकशॉ यांच्या प्रेरणादायी कथेचा भाग बनणे हा मोठा सन्मान आहे. मला आशा आहे की ज्यांनी सॅम माणेकशॉ यांच्याबद्दल ऐकले नाही ते देखील त्यांना पाहिल्यानंतर नेहमी त्यांची आठवण ठेवतील” तर चित्रपटातील तिच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना सान्या मल्होत्रा ​​म्हणते, “सॅम माणेकशॉ यांच्या संपूर्ण प्रवासात त्यांची सपोर्ट सिस्टम असलेल्या सिल्लूची भूमिका साकारणे हा एक मोठा सन्मान आहे. विकीसोबत मी पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत आहे. मेघना गुलजारसोबतचा हा माझा पहिला चित्रपट आहे. माझ्या पात्राला पूर्ण न्याय देण्याचा माझा प्रयत्न असेल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

Back to top button