भारती सिंहच्या मुलाचं नाव आलं समोर | पुढारी

भारती सिंहच्या मुलाचं नाव आलं समोर

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि पती हर्ष लिंबाचिया हे गेल्या एप्रिलमध्ये नुकतेच आई – वडिल बनले. यानंतचर दोघांनी वैयक्तीक आयुष्यातील अपडेटस सोशल मीडियावर देत असते. याच दरम्यान त्यांनी लहान बाळाला प्रेमाने गोला म्हणत असल्याचे सांगितले होते. यानंतर सध्या भारतीच्या मुलाचं खरं नाव समोर आलं आहे.

नुकतेच भारतीने एका पोस्टच्या माध्यमातून आपल्या मुलाचे नाव ‘लक्ष्य’ असल्याचे सांगितले आहे. तसेच यावेळी तिने ‘लक्ष्य’ अजून लहान असून त्याने जन्माला येण्यापूर्वीचं आई-वडिलांसोबत काम केले असल्याचे म्हटले आहे. याआधी भारतीने मुलाची पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. परंतु, त्यात बाळाचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. भारतीने आई झाल्याची गुडन्यूज दिल्यानंतर चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला होता.

झोपाळ्यावरून पडतानाचा  व्हिडीओ व्हायरल

याच दरम्यान भारतीचा झोपाळ्यावरून पडतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होता आहे. या व्हिडिओत भारती एका बागेतील झोपाळ्यावर पायाची मांडी घालून झोके घेत होती. जोरजोरात झोके घेत असताना तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. तसेच या व्हिडिओत काही हिरवी गार झाडे आणि बाजूला पाण्याचा तलाव दिसतोय.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भारतीची काळजी करत आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात भारतीला काही लागले आहे काय? , तिच्या बाळाला काही लागले आहे काय?, यासारखे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. याशिवाय काही नेटकऱ्यांनी या फनी व्हिडिओवर हार्ट आणि स्मायली ईमोजी शेअर केले आहेत.

हेही वाचलंत का?

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

Back to top button