जम्मू-काश्मीरात ऑगस्टमध्ये विधानसभा निवडणूक?

जम्मू-काश्मीरात ऑगस्टमध्ये विधानसभा निवडणूक?

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीरमध्ये ऑगस्ट अथवा सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक घेण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाकडून लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

भाजपने सोमवारी ( विधानसभा निवडणूक होऊ घातलेल्या राज्यांमध्ये प्रभारी आणि सहप्रभारींची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये जम्मू काश्मीरचा देखील समावेश असल्याने या राज्यातही विधानसभा निवडणूक घेण्याचे संकेत मिळाले आहेत. लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याबाबत जम्मू काश्मीरमधील जनतेमध्ये उत्साह दिसून आला होता. जम्मू काश्मिरात ५८. ५८ टक्के तर खोऱ्यात ५१. ५ टक्के मतदान झाले होते.

काश्मिरात गेल्या ६ वर्षात विधानभा निवडणूक झाली नसताना मतदारांचा उत्साह पाहून निवडणूक आयोगाने राज्याची सीमा आखणी आणि मतदारांची सुधारित यादी तयार केली आहे. विधानसभा निवडणूक पार पडताच जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा दिला जाण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मिरात विधानसभेच्या ९० जागा आहेत. त्यामध्ये जम्मू प्रदेशातील ४३ तर काश्मीर क्षेत्रातील ४७ जागांचा समावेश आहे. राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news