सुशांत प्रकरणाची सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब | पुढारी

सुशांत प्रकरणाची सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब

मुंबई : पुढारी वृत्तसेवा 

अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी सर्वत्र  उलटसुलट चर्चा सुरू असताना या प्रकरणाचा तपास सीबीआय अथवा एसआयटीमार्फत करण्याची विनंती करणाऱ्या याचिकेची उच्च न्यायालयाने आज दखल घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाने राज्य आणि केंद्र सरकारला याचिकेची प्रत उपलब्ध करून देण्याचे याचिकाकर्त्यांना निर्देश देत याचिकेची सुनावणी शुक्रवार दि. ७ ऑगस्टपर्यंत तहकूब ठेवली. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी पोलिसांमार्फत सुरू असलेल्या तपासाबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित करून समित ठक्कर यांनी उच्च न्यायालयात याचिका दखल केली आहे. त्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता, न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या  खंडपीठासमोर आज प्राथमिक सुनावणी झाली.

त्याचबरोबर सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. सुशांतच्या वडिलांनी पाटणामध्ये दाखल केलेली केस मुंबईमध्ये ट्रान्सफर करण्याची मागणी रियाने केली आहे. 

रियाच्या याचिकेवर न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांचे खंडपीठ सुनावणी करणार आहे. या प्रकरणी बिहार आणि महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केले आहे. त्याशिवाय सुशांतचे वडील कृष्ण किशोर सिंह यांनीदेखील कॅव्हेट दाखल केले आहे. 

रियावर सुशांतच्या वडिलांचे आरोप

सुशांतचे वडील के के सिंह यांनी २६ जुलैला पाटणाच्या राजीव नगर पोलिस स्टेशनमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयातील तीन सदस्य आणि दोन मॅनेजरविरोधात केस दाखल केली आहे. मनी लॉन्ड्रिंग, ब्‍लॅकमेल करणे, आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे अन्य गंभीर आरोप यामध्ये करण्यात आले आहेत. त्यानुसार, पोलिसांनी रियाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

वाचा – सुशांत प्रकरण : सीबीआयर्माफत तपास; बिहारच्या मागणीला केंद्राकडून परवानगी 

Back to top button