मित्राचा मोठा खुलासा, सुशांतला ‘या’ गोष्टीची वाटत होती भीती  | पुढारी

मित्राचा मोठा खुलासा, सुशांतला 'या' गोष्टीची वाटत होती भीती 

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह १४ जूनला राहत्या घरी गळफास घेतलेला अवस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास अद्यापपर्यंत मुंबई पोलिस करत होती. पाटमामध्ये रिया चक्रवर्तीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आतापर्यंत सुशांतशी संबंधित अनेक लोकांचे स्टेटमेंट पोलिसांनी नोंदवून घेतले आहेत. आता त्याचा फ्लॅटमेट, जवळचा मित्र सिद्धार्थ पिठानी सध्या खूप चर्चेत आहे. सिद्धार्थने सुशांतविषयी खुलासा केली आहे. 

एका इंग्रजी वेबसाईटला सिध्दार्थने दिलेल्या माहितीनुसार, सुशांतला वाटत होतं की, पुढे जाऊन त्याला फिल्म इंडस्ट्रीत कुठलाही जॉब मिळणार नाही किंवा चित्रपट मिळणार नाहीत. 

सुशांतने सिध्दार्थला आपल्याकडे राहायला बोलावून घेतले होते. सिध्दार्थ आपली नोकरी सोडून सुशांतकडे आला होता. सुशांतने त्याला म्हटले होते की, तो त्याला पैसे देऊ शकणार नाही. कारण, कदाचित त्याला कोणताही चित्रपट मिळू शकणार नाही. जेव्हा सिद्धार्थने याचे कारण विचारले तेव्हा सुशांत काही सांगू शकला नाही, असे सिध्दार्थ म्हणाला. 

कुटुंबीयांप्रमाणे आहे रिया

सुशांतला आपल्या खर्चाचीदेखील चिंता होती. सुशांतच्या स्टाफने सिद्धार्थला सांगितलं होतं की, रिया सुशांतचे कार्ड यूज करून वस्तू ऑर्डर करते. जेव्ही सिद्धार्थने याविषयी सुशांतला विचारले तेव्हा सुशांत म्हणाला होता की, चिंता करू नकोस,  रिया कुटुंबियांप्रमाणे आहे.

 

Back to top button