दिग्दर्शक निशिकांत कामतची प्रकृती चिंताजनक | पुढारी

दिग्दर्शक निशिकांत कामतची प्रकृती चिंताजनक

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

‘डोंबिवली फास्ट’ या मराठी चित्रपटापासून चंदेरी दुनियेत पाऊल टाकणारा प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामतची सध्या प्रकृती खालावलेली आहे. तो लिव्हर सिरोसिस आजाराने ग्रस्त असल्याचे समजते आहे. निशिकांतवर हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात गेल्या १० दिवसांपासून उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे सांगण्यात आले असून सध्या तो आयसीयूमध्ये दाखल आहे.

निशिकांत कामतने मराठी चित्रपट इंडस्ट्रीतून श्रीगणेशा केला असला तरी त्याने आपला दिग्दर्शनाचा झेंडा बॉलिवूडमध्येही फडकावलाय. त्याने दृष्यम, मदारी, मुंबई मेरी जान, फोर्स २, रॉकी हँडसम यासारख्या अनेक हिंदी चित्रपटातून आपला ठसा उमटवला आहे. निशिकांटच्या डोंबिवली फास्ट या मराठी चित्रपटाला अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. निशीकांतला काही दिवसांपासून यकृताचा आजार होता, त्याचं हे दुखणे पुन्हा एकदा बळावल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समजते आहे. 

Back to top button