सलमान खानच्या हत्येचा कट उधळला | पुढारी

सलमान खानच्या हत्येचा कट उधळला

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट उधळण्यात आला आहे. सलमानच्या हत्येसाठी मुंबईत रेकी करणाऱ्याला गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. राहुल ऊर्फ सांगा ऊर्फ बाबा असं या गँगस्टरचं नाव असून तो लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचे समजते.

बिश्नोई गँगकडून याआधीच सलमानला जीवे मारण्याच्या आल्या होत्या. राहुल गँगस्टर असून त्याने आतापर्यंत चार जणांच्या हत्या केल्या आहेत. दिल्लीच्या गुन्हा अन्वेषण विभागाने त्याला उत्तराखंड येथे अटक केली होती. राहुल याने बॉलिवूड अभिनेता सलमानची मुंबईतील वांद्रे येथे जानेवारीमध्ये रेकी केली होती. त्याला गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली असून त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

Back to top button