अथिया शेट्टीच्या ‘त्या’ पोस्टवर के. एल. राहुल म्हणतो… | पुढारी

अथिया शेट्टीच्या 'त्या' पोस्टवर के. एल. राहुल म्हणतो...

मुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूड आणि क्रिकेट हे एक प्रेमाच समीकरणचं बनलं गेलं आहे. या प्रेमाच्या समीकरणातील बऱ्याच जोड्या आजवर चर्चेत राहिल्या आहेत. सध्या अशीच एक जोडी चर्चेचा विषय बनली आहे. सुनील शेट्टी यांची मुलगी व अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय संघाचा खेळाडू के. एल. राहुल या दोघांच्या अफेअर्सच्या चर्चा सोशल मीडियावर चांगल्याच रंगू लागल्या आहेत. अथियाने तिचा एक फोटो सोशल मीडियावर नुकताच पोस्ट केला. तिच्या या फोटोवर के. एल. राहुलने दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरतेय.

अथिया आणि के. एल. राहुलने रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली आतापर्यंत दिली नसली तर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चेला उधाण आले आहे. अथियाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वीमसूट परिधान केला असून आरशात पाहताना सेल्फी काढला असलेला फोटो पोस्ट केला आहे. तिच्या या फोटो कलाकारांसह अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. दरम्यान,  के. एल. राहुलने देखील प्रतिक्रिया देत आपली भावना व्यक्त केली आहे. 

राहुलने अथियाच्या या फोटोवर ‘जेफा’ (Jefa) अशी कमेंट केली आहे. जेफा हा स्पॅनिश शब्द असून त्याचा अर्थ बॉस असा होतो. त्याच्या या अशा कमेंटमुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

यापूर्वी अथियाने के. एल. राहुलला वाढदिनानिमित्त शुभेच्छा देताना त्याच्यासोबतचा एक फोटो शेअर करत ”हॅप्पी बर्थडे माय पर्सन” असे म्हटले होते. तिच्या पोस्टमुळे दोघांच्या अफेअर्सच्या चर्चने जारे धरला होता.

एका मुलाखती दरम्यान, अथियाला रिलेशनशिपबद्दल विचारले असता मला माझे खासगी आयुष्य सार्वजनिक करायला अजिबात आवडत नाही. मला माझे खासगी आयुष्य जपायला आवडते. त्यामुळेच मला माध्यमांसमोर काही गोष्टी सांगायला आवडत नाही. असे अथियाने म्हटले होते. तिच्या या प्रतिक्रियेमुळे बी टाऊन आणि क्रिकेट जगतात अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. 

Back to top button