ड्रामा क्वीन कंगना राज्यपालांची भेट घेणार! | पुढारी

ड्रामा क्वीन कंगना राज्यपालांची भेट घेणार!

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

वादग्रस्त विधाने करत सुटलेल्या कंगना राणावत आणि शिवसेनेमध्ये संघर्ष सुरु आहे. पालिकेने तिच्या घरातील कार्यालयात उभारलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे. कंगनाने मुंबईतील परिस्थिती पाकिस्तानव्याप्त काश्मीरप्रमाणे असल्यासारखे म्हटल्याने टीका झाली होती. त्यामुळे चांगलेच राजकारण रंगले आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री कंगना राणावत उद्या रविवार १३ सप्टेंबर रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे. 

कंगना राणावत राजभवनावर संध्याकाळी साडेचार वाजता कंगना राज्यपालांची भेट घेणार आहे. अभिनेत्री कंगना राणावत व शिवसेना यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. कंगनाने आपण ९ तारखेला मुंबईत येत असून हिंमत असेल तर रोखून दाखवा, असे आवाहन केले होते. 

वाचा : कोरोनामुळे फुफ्फुसाचे २५ वर्षे धूम्रपान केल्याइतके नुकसान!

वाचा : मुंबईतील मारहाण दिल्लीत पोहोचली; थेट संरक्षण मंत्र्यांकडून दखल!

वाचा : ॲ‌क्सिस बँक प्रकरण पदाचा गैरवापर नव्हता का? : एकनाथ खडसे

Back to top button