चौदा वर्षाची असताना माझ्यावर लैंगिक अत्याचार; आमीर खानच्या मुलीचा खुलासा | पुढारी

चौदा वर्षाची असताना माझ्यावर लैंगिक अत्याचार; आमीर खानच्या मुलीचा खुलासा

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड अभिनेता आमीर खानची मुलगी इरा खानने आपण १४ वर्षाची असताना आपले लैंगिक शोषण झाले होते, असा धक्कादायक खुलासा केला आहे. तिने हा खुलासा सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे. इरा खानने इन्स्टाग्रामवर याबाबत व्हिडिओ पोस्ट केला आहे. 

मी खूप लहान होते तेव्हा माझ्या पालकांचा घटस्फोट झाला होता. सर्व काही ठिक होते. माझ्या आई-वडिलांमध्ये घटस्फोटानंतरही छान मैत्रीचे संबंध होते. पालकांनी माझ्या सर्व इच्छा पुर्ण केल्या. पण त्या घटनेने माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला. मी सहा वर्षांची होते त्यावेळी मला टीबी झाला होता. मी १४ वर्षांची होते तेव्हा माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले होते. अशा अनेक लहान लहान घटना घडत गेल्या ज्यांचा परिणाम माझ्या आयुष्यावर होत होता. मी दिवसांतील बहुतांश वेळ केवळ झोपून काढायचे. हळूहळू मी गर्दीत असूनही स्वत:ला एकटी समजू लागले. एक वेळ आली जेव्हा मी डिप्रेशनमध्ये असल्याची जाणीव मला झाली, असे इरा खानने इन्स्टाग्रामवर पोस्टमध्ये म्हटलं आहे.

तिने ‘जागतिक मानसिक आरोग्य दिना’च्या निमित्ताने एक व्हिडिओ शेअर केला आहे. कधीकाळी मी नैराश्यामध्ये होती, असे तिने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. 

वाचा : ‘मिर्झापूर’ची डिम्पी खऱ्या आयुष्यात इतकी बोल्ड

वाचा : लेडी गागाने अडीच मिनिटांत ९ वेळा बदलला ड्रेस (video)  

Back to top button