बुर्ज खलिफावर झळकला शाहरुख (VIDEO) | पुढारी

बुर्ज खलिफावर झळकला शाहरुख (VIDEO)

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

शाहरुख खान सध्या दुबईमध्ये आहे आणि त्याने तिथे आपला वाढदिवसदेखील साजरा केला आहे. दुबईमध्ये शाहरुख खानच्या बर्थडेचा जल्लोष शानदार राहिला. येथे संपूर्ण बुर्ज खलिफा शाहरुखसाठी सजवण्यात आलं होतं. या सुंदर क्षणांचे व्हिडिओज खूप व्हायरल होत आहेत. जेथे शाहरुख खुद्द बुर्ज खलिफाच्या टॉवरवर आपल्या वाढदिवसाला एन्जॉय करताना दिसत आहेत. 

शाहरुख खानच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त हा व्हिडिओ त्याच्या फॅन पेजवर शेअर केला आहे. बुर्ज खलिफा शाहरुखला बर्थडे विश करण्यासाठी झगमगले. या व्हिडिओमध्ये शाहरुख आपल्या समोर असलेल्या उपस्थित फॅन्सचे आभारदेखील मानले आहेत. 

शाहरुख खानने या औचित्याने एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो बुर्ज खलिफा टॉवर समोर उभारला आहे. त्यावर हॅप्पी बर्थडे शाहरुख लिहिलेलं दिसत आहे.

शाहरुख खानने म्हटलंय की, ‘स्वत:ला जगातील सर्वांत मोठ्या आणि लांब स्क्रीनवर पाहणं खूप सुखद आहे. माझा फ्रेंड मोहम्मद अलावर (Developer of Burj Khalifa and the Dubai Mall) ने मला आपल्या पुढील चित्रपटाआधी सर्वात मोठी स्क्रीन दिली. थँक्स बुर्ज खलिफा आणि दुबई आपल्या सर्वांना प्रेम.’

याआधीही दुबई आणि बुर्ज खलिफामध्ये शाहरुखचा बर्थडे खूप जल्लोषात साजरा करण्यात आला आहे. 

VIDEO – burjkhalifa insta वरून साभार 

 

Back to top button