अंकिता लोखंडेनं बदलली हेअर स्टाईल | पुढारी

अंकिता लोखंडेनं बदलली हेअर स्टाईल

मुंबई : पुढारी ऑनलाईन

टिव्हीपासून ते बॉलिवूड पर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे अलीकडे वारंवार चर्चेमध्ये येऊ लागली आहे. सध्या ती नियमितपणे आपले काही व्हिडिओ आणि फोटो समाज माध्यमांवर शेअर करुन आपल्या दिलखेच अदांनी चाहत्यांना आकर्षित करुन घेत असते. नुकतेच तिने हेअर स्टाईल चेंज करुन आपला लूक बदलला आहे. याचा व्हिडिओ तिने इस्टाग्रामवरुन शेअर करुन चांगलीच वाहवा मिळवली. तसेच हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. अंकिताच्या चाहत्यांकडूनही या व्हिडिओवर चांगल्या प्रतिक्रीया येत आहेत.

अंकिता लोखंडेने हेअर स्टाईल बदलल्याने तिचा बदललेला अंदाज खूपच वेगळा आणि आकर्षक दिसत आहे. हा बदल चाहत्यांनाही मोहून टाकत आहे. या नव्या लूकचे व्हिडिओ अंकीताने इस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या चाहत्यांना हा बदल चांगलाच पंसतीस उतरला आहे. यापूर्वी तिने ‘करवाचौथ’च्या वेळी लाल रंगाच्या साडीतला फोटो शेअर केला होता. त्याही लूकमध्ये ती खूप सुंदर दिसली होती.

अंकिता लोखंडेने आपली सुरुवात पवित्र रिश्ता या टीव्ही मालिकेपासून केली. या मालिकेमधून ती खूप प्रसिद्ध झाली आणि तेव्हापासून तिला खूप लोकप्रियताही मिळाली. यानंतर तिने बॉलिवूडमध्ये ‘मणिकर्णिका’ या चित्रपटाद्वारे पाऊल ठेवले. त्या चित्रपटातील तिच्या अभिनयाला मोठी दाद मिळाली. टायगर श्रॉफच्या ‘बागी ३’ मध्ये ती दिसली होती. अंकिता ही तिच्या अभिनयाने आणि वेगवेळ्या स्टाईलद्वारे नेहमीच प्रेक्षकांच्या स्मरणात राहण्याचा प्रयत्न करीत असते. 

 

Back to top button