‘ये रिश्ता क्या कहलता है’ फेम अभिनेता करण मेहराला अटक | पुढारी

‘ये रिश्ता क्या कहलता है’ फेम अभिनेता करण मेहराला अटक

मुंबई: पुढारी ऑनलाईन; ‘ये रिश्ता क्या कहलता है’ फेम  टीव्ही अभिनेता करण मेहराला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्याची पत्नी निशा रावलने घरगुती हिंसाचार करत असल्याचे आरोप त्याच्यावर केले आहेत. सोमवारी रात्रीच निशाने करणविरोधात तक्रार दाखल केली होती.

माधुरी-जुही चावलाने अभिनेत्यासोबत का केलं नाही लग्न? 

अभिनेता करण आणि निशा रावल गेल्या ९ वर्षांपोसून सोबत आहेत. २०१२ सालात त्यांनी लग्नगाठ बांधली. करण आणि निशा कामामध्ये व्यस्त असल्याने दोघांच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण झाल्याचे बोलले जात होते. मात्र, निशासह करण मेहराने देखील स्पष्टीकरण देत होणाऱ्या चर्चेला अफवा असल्याचे म्हटले होते. 

चित्रपट निर्माता जॅकी भगनानीसह ९ जणांवर लैंगिक शोषणाचा आरोप

मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निशाने सोमवारी ३१ मे रोजी गोरेगाव पोलीस ठाण्यात करणविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. निशाने प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करणवर केला आहे. यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून करणला तातडीने ताब्यात घेण्यात आले आहे. 

शनाया कपूरने जाळीदार बिकिनीमध्ये दाखवली सेक्सी फिगर

 टीव्ही मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये करण मेहरा मुख्य भूमिकेत दिसला होता. या मालिकेत करणबरोबर हिना खानही मुख्य भूमिकेत होती. याशिवाय करण ‘बिग बॉस १०’ आणि ‘नच बलिये ५’ मध्येही दिसला आहे. निशा रावलबद्दल बोलायचं झालं तर ती सध्या शादी मुबारक या मालिकेत दिसत आहे. करण आणि निशाने २०१२ मध्ये लग्न केले होते आणि त्यांना चार वर्षांचा मुलगा कविश आहे.

Back to top button