Jersey : शाहिदला ‘बीस्ट’, ‘केजीएफ-२’ची भीती | पुढारी

Jersey : शाहिदला ‘बीस्ट’, ‘केजीएफ-२’ची भीती

पुढारी ऑनलाईन

शाहिद कपूरचा आगामी चित्रपट ‘जर्सी’च्या प्रदर्शनाची तारीख आता आठवडाभर पुढे ढकलण्यात आली आहे. ‘केजीएफ चॅप्टर’ आणि ‘बीस्ट’ या दोन चित्रपटांबरोबर बॉक्स ऑफिसवर ‘क्लॅश’ होण्याची भीती असल्याने चित्रपटाची रीलिज डेट पुढे ढकलण्यात आली. या चित्रपटात शाहिदबरोबर मृणाल ठाकूर प्रमुख भूमिकेत आहे. चित्रपट समीक्षक आणि ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शाहिदच्या ‘जर्सी’चे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली आहे. आता हा चित्रपट 14 एप्रिल ऐवजी 22 एप्रिलला प्रदर्शित होईल. दरम्यान, या चित्रपटावर स्क्रीप्ट चोरीचा आरोप लागला असल्याने चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडल्याचेही म्हटले जात आहे.

Back to top button