गौरव उपासानीचा येतोय ‘झटका- आत्ता सुरवात गोंधळाची’ | पुढारी

गौरव उपासानीचा येतोय 'झटका- आत्ता सुरवात गोंधळाची'

पुढारी ऑनलाईन; मराठी चित्रपटामध्ये या वर्षाच्या सुरुवातीपासून वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केला जात आहे. या सर्व चित्रपटांना छेद देत दिग्दर्शक अजिंक्य उपासानी आपल्याला ‘झटका’ द्यायला सज्ज झाले आहेत. नुकताच ‘झटका- आत्ता सुरवात गोंधळाची’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच केल्यानंतर आता चित्रपटाचा टिझर चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

उत्तेजन स्टुडियोजची निर्मिती असलेला ‘झटका – आत्ता सुरवात गोंधळाची’ हा मराठी सिनेमाजगतातील पहिला ब्लॅक कॉमेडी चित्रपट आहे. ‘ झटका ‘ या चित्रपटाचं दिग्दर्शन अजिंक्य उपासानी यांनी केलं आहे. तर डॉ. पार्थ सारथी चित्रपटाचे निर्माते आहेत.

‘झटका’ या चित्रपटात ‘तुला पाहते रे’ या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिकेत झळकलेल्या पूर्णिमा डेला नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. पूर्णिमासोबत अभिनेता गौरव उपासानी रुपेरी पडद्यावर पदार्पण करतोय. गौरवने याअगोदर अनेक हिंदी शॉर्टफिल्म्समध्ये काम केले आहे.

‘चिअर्स टू लाइफ’ या नावाची मराठीतील शॉर्टफिल्म्समध्येही गौरव झळकला आहे. गौरवने ‘झटका’ या चित्रपटासाठी लेखनही केलं आहे. पोस्टरवरुनच गौरव आणि पूर्णिमा बंद कपाटालालागून घाबरुन उभे राहिल्याचे दिसत आहेत. कपाटातील नेमकी कोणती गोष्ट पूर्णिमा आणि गौरव लपवताहेत? पोस्टरमध्ये कपाटातून बाहेर येणारा ‘तो’ चेहरा कोण ? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ‘झटका’ चित्रपटाच्या टिझरमध्ये पाहायला मिळणार आहे. ‘झटका’ हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहात चाहत्याच्या भेटीस येत आहे.

हेही वचलंत का? 

Back to top button