‘८३’ नंतर आदिनाथ कोठारे दिसणार रोहन सिप्पीच्या नव्या चित्रपटात | पुढारी

'८३' नंतर आदिनाथ कोठारे दिसणार रोहन सिप्पीच्या नव्या चित्रपटात

पुढारी ऑनलाईन; अभिनेता आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक आदिनाथ कोठारे याने गेल्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. कबीर खान दिग्दर्शित ८३ या बिग बजेट मल्टिस्टारर चित्रपटात आदिनाथ कोठारे एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसला तर नागेश कुकनूर दिग्दर्शित ‘सिटी ऑफ ड्रिम्स’ या वेबसीरीजमधून त्याने डिजीटल विश्वातही पदार्पण केले आहे.

यानंतर आदिनाथ आता नव्या कोणत्या बॉलिवूड प्रोजेक्टमधून दिसेल या विषयी चाहत्यांना उत्सुकता शिगेला पोहोचली होती. याच दरम्यान आदिनाथ नुकताच रोहन सिप्पीसोबत एका फोटोत दिसल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

अभिनेता आदिनाथ कोठारे याने ‘मी रोहन सिप्पीच्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. रोहन सिप्पी माझ्या आवडत्या बॉलिवूड दिग्दर्शकांपैकी एक आहे. त्यामुळे रोहन सिप्पीच्या प्रोजेक्टचा हिस्सा होणं, नक्कीच सुखद म्हणावे लागेल. सध्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. यंदा हे प्रोजेक्ट चाहत्यांच्या भेटीला येईल.’ असे म्हटलं आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ‘आदिनाथ स्वत: निर्माता-दिग्दर्शक असल्याने आपल्यासाठी भूमिकांच्या निवडीबाबत तो खूप चोखंदळ आणि सजग असतो. त्यामुळेच तर बॉलिवूडमधून सातत्याने ऑफर्स येऊनही त्याने आपल्या डेब्यूसाठी कबीर खान आणि नागेश कुकनूर याच्या कलाकृतींची निवड केली. रोहन सिप्पी हे, त्या नावाजलेल्या दिग्दर्शकांच्या यादीतले एक मोठे नाव आहे, ज्यांना संहितेविषयी उत्तम जाण आहे. अशावेळेस रोहन सिप्पींसोबत त्याने आपले नवे प्रोजेक्ट करणेही त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणायला हवी.’

हेही वाचलंत का? 

Back to top button